Your Alt Text

एका बापाची औलाद असाल तर, त्या ‘बांडगुळांनी’ नीट राहावं; अन्यथा त्यांच्या मुळव्याधावर ‘तिखट मिरचीने’ उपचार करावा लागेल !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

संपादकीय (एल्‍गार न्‍यूज) :-
पत्रकारिता ही तलवारीच्या धारेवरची कसरत आहे. समाजहितासाठी आणि सत्यासाठी लेखणी चालवली की, अनेकांचे पित्त खवळणे स्वाभाविक आहे. पण, जेव्हा ही लढाई समोरासमोर करण्याची हिंमत नसते, तेव्हा काही ‘भेकड’ आणि ‘विखारी’ बांडगुळं पडद्यामागून हालचाली सुरू करतात. माझ्या रोखठोक व इमानदार पत्रकारितेमुळे ज्यांचा ‘मुळव्याध’ उफाळून आला, त्यांनी मागील काही काळापासून कटकारस्‍थान व लावालावीचा धंदा सुरू केला आहे. पण लक्षात ठेवा, तुमची ही ‘काडीबाज’ वृत्ती आता तुमच्याच अंगलट येणार आहे ! तुम्ही कितीही कटकारस्‍थान व लावालावी केली, तरी या वाघाची शिकार करण्याची तुमच्‍या सारख्‍या नपुंसकांची लायकी नाही !

स्वतःची कर्तबगारी शून्य असलेल्या या ‘भिकारचोट’ बांडगुळांनी मागील काळात माझ्या कुटुंबात विष कालवण्याचा धंदा सुरू केला होता. काही अंशी त्‍यांना यश आले होते, परंतू कालांतराने ते उघडे पडले आहेत. पडद्यामागून माझ्या कुटुंबातील सदस्यांचे कान भरणे, घरात भांडणं लावून देणे, मला खोट्या गुन्‍ह्यात अडकवण्‍याची कुटुंबियांना भिती दाखवणे, मी पत्रकारतेतून बाहेर पडावे इथपर्यंत प्रयत्‍न करणे, माझ्याविरूध्‍द कटकारस्‍थान रचणे, माझे खच्‍चीकरण करणे आणि मला एकटे पाडण्याचा प्रयत्न करणे, हा यांचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे यांच्या ‘नपुंसक’ मानसिकतेचे प्रदर्शन आहे. ज्यांना समोरासमोर येऊन दोन हात करण्याची हिंमत नाही, तेच असे ‘घरभेदी’ कटकारस्‍थान रचतात.

समाज हिताच्‍या रोखठोक आणि निर्भीड बातम्‍या प्रकाशित केल्‍यानंतर जेव्‍हा अनेक प्रयत्‍न करूनही यांना मला रोखण्‍यात यश आले नाही तेव्‍हा कुंभार पिंपळगावातील या कटकारस्‍थान रचणाऱ्यांनी बदनामीचा प्रयत्‍न केला. या बदनामीचा धंदा करणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की, “बेडकाने कितीही फुगून तोंड वासलं तरी तो कधी सिंह बनू शकत नाही आणि कावळ्याने स्वतःचं अंग कितीही मोत्याने मढवलं तरी तो कधी राजहंस होऊ शकत नाही.” तुमची ही पडद्यामागून लपून वार करण्याची ‘नामर्द’ प्रवृत्ती तुमच्याच अधोगतीचं कारण ठरेल. माझ्या रोखठोक आणि निर्भीड पत्रकारितेला ‘बदनामीच्या ढगांनी’ झाकणं तुमच्या सात जन्मातही शक्य नाही !

सहन करणार नाही !

खूप सहन केलं, आता पुरे झालं! तुमची ही पडद्यामागची लपाछपी आणि भिकारचोट वृत्‍तीचे कटकारस्‍थान आता माझ्या ‘टार्गेट’वर आहे. जर तुम्ही तुमची ही नपुंसक कृत्ये थांबवली नाहीत, तर तुमचा ‘योग्य तो समाचार’ चार चौघात घेतला जाईल. तुमचे छुपे कारनामे, कटकारस्‍थान आणि तुमचे हे लावालावीचे धंदे पुराव्यानिशी या पोर्टलवर प्रसिद्ध केले जातील. मग बघा समाजात तुमची अवस्‍था कशी होते ती ! अर्थातच तुमच्‍या सर्वांच्‍या कुंडल्‍या उघडायला मला वेळ लागणार नाही.

जवळचे असो की लांबचे !

मागील काळात घडलेल्‍या घटनेवरून आपले कोण आणि परके कोण हे स्‍पष्‍टपणे लक्षात आले आहे. सदरील घडलेली घटना जिव्‍हारी लागली आहे यात शंका नाही आणि विसरलेलो सुध्‍दा नाही. अर्थातच योग्‍य वेळी योग्‍य तो कार्यक्रम होणारच आहे. मागील काळात कोण लावालावी केली, कोणी धमक्‍या दिल्‍या, कोणी बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न केला, कोणी कटकारस्‍थान रचले, कोणी दबाव टाकला याचे पुरावे उपलब्‍ध आहेत. यामध्‍ये ओळखीचे आणि जवळचेच नव्‍हे तर गावातील १ – २ नातेवाईक पाहुणे सुध्‍दा असल्‍याचे समोर आले आहे. त्‍यामुळे यापुढील काळात एका बापाची औलाद असणाऱ्यांनी माझ्या संदर्भात कुटुंबातील सदस्‍याला संपर्क साधून लावालावी, धमक्‍या, कटकारस्‍थान किंवा दबाव टाकण्‍याचा प्रयत्‍न करू नये, अर्थात तसे केल्‍यास तो थेटपणे दुश्‍मन ठरेल याची नोंद घ्‍यावी, मग तो जवळचा असो, लांबचा असो, मित्र असो, नातेवाईक असो, पाहुणा असो किंवा गावातील एखादा पत्रकार असो…

नादी लागू नका !

माझ्याकडे गमवण्‍यासारखे काहीही नाही. त्‍यामुळे कोणाचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. शिवाय आयुष्‍यात कधीही निवडणूक लढण्‍याची इच्‍छा नव्‍हती आणि आता तर मुलाबाळांमुळे तो प्रश्‍नच राहीलेला नाही. अर्थातच त्‍यामुळे कोण नाराज होईल किंवा कोणाचा मुळव्‍याध उठेल याच्‍याशी मला काहीही देणेघेणे नाही. त्‍यामुळे एका बापाची औलाद असणाऱ्यांनी माझ्या बातमी किंवा कोणत्‍याही संदर्भात कोणीही माझ्या कुटुंबातील कोणत्‍याही सदस्‍याला (प्रत्‍यक्ष / अप्रत्‍यक्ष) संपर्क साधून लावालावी, धमक्‍या आणि दबाव टाकण्‍याचा प्रयत्‍न करू नये. आणि जर तसे केलेच तर त्‍याने मला काहीही फरक पडणार नाही, कारण माझा कोणीही मालक नाही.

मात्र कुटुंबातील कोणत्‍याही सदस्‍याकडे कोणी लावालावी, धमकी किंवा दबाव टाकण्‍याचा प्रयत्‍न करत असल्‍याचा अंदाज जरी आला तरी सर्व सदस्‍यांचे कॉल डिटेल्‍स काढले जातील शिवाय लपून छपून लावालावी करणाऱ्यांची आणि कटकारस्‍थान रचणाऱ्यांची माहिती काढली जाईल आणि चारचौघात त्‍यांचा योग्‍य तो समाचार घेतला जाईल अर्थातच त्‍यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील याची त्‍या बांडगुळांनी स्‍पष्‍टपणे नोंद घ्‍यावी.

कायद्याचे राज्‍य !

हे कायद्याचे राज्‍य असून लोकशाही अस्तित्‍वात आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहु-आंबेडकर यांचे विचार आणि विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्‍या कायद्यानेच कारभार चालतो. येथे कोणीही हुकुमशाही, दडपशाही, गुंडगिरी, दादागिरी करण्‍याचा प्रयत्‍न करू नये, अर्थातच ते सहन केले जाणार नाही आणि आजच्‍या काळात ते शक्‍य सुध्‍दा नाही. कारण कायद्यानेच हुकुमशाही मानसिकतेला योग्‍य त्‍या ठिकाणी पाचर ठोकलेली आहे.

समाजहितासाठी लढा !

मी मागील जवळपास २ वर्षांपासून AI (Artificial Inteligence) व Content Creation वर काम करीत आहे. (येत्‍या काळात त्‍याचा फायदा आणि परिणाम नक्‍कीच दिसून येईल याची खात्री आहे.) पत्रकारिता करत असतांना या गोष्‍टींवर थोडं फोकस केलं आहे. मागील १८ वर्षे इमानदारीने पत्रकारितेच्‍या माध्‍यमातून समाजासाठी निस्‍वार्थपणे दिली. (परिसरातील नागरिकांना आणि जालना जिल्‍ह्यातील समस्‍त पत्रकारांना माहित आहे.) अक्षरश: या काळात स्‍वत:च्‍या स्‍वप्‍नांची राखरांगोळी झाली, मुलाबाळांना छोट्या छोट्या गोष्‍टींना तरसवलं, पण रोखठोक लेखणी थांबवली नाही.

खरं तर २५ वर्षे Computer चा अनुभव, पत्रकारितेची पदवी (Bachelor of Mass Communication & Journalism), Graphic Designing, Script Writing, Content Creation, AI तंत्रज्ञान अशा विविध गोष्‍टींची चांगली माहिती असल्‍याने शहरात चांगल्‍या संधी असतांनाही गांव-सर्कल, तालुका आणि जिल्‍ह्यातील महत्‍वपूर्ण प्रश्‍नांसाठी झटत राहीलो. परंतू दुर्दैवाने या कार्याची जेवढी दखल घ्‍यायला पाहीजे होती तेवढी घेण्‍यात आली नाही. वेळप्रसंगी जवळची माणसं, नातेवाईक-पाहुणे सुध्‍दा स्‍वार्थापोटी विरोधात जावू शकतात, एवढंच नव्‍हे तर सहकारी असलेला जवळचा पत्रकार सुध्‍दा विरूध्‍द गटात मॅनेज होवून पाठीत खंजीर मारू शकतो हे उशीरा लक्षात आले. पत्रकारिता सुटणार नाही, परंतू पुढील काळात वरील शिक्षण आणि अनुभवाच्‍या जोरावर प्रगतीच्‍या दिशेने अधिकचा वेळ देण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल.

सपोर्ट करणाऱ्यांचे आभार !

मागील काळात चक्रव्‍युव्‍ह रचून मला अडचणीत आणण्‍याचा प्रयत्‍न झाला, बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न झाला, मात्र अशा परिस्थितीत माझ्यावर विश्‍वास ठेवणारे सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, वकील, डॉक्‍टर, शेतकरी, राज्‍यातील पत्रकार, गांव परिसरातील मित्र व मान्‍यवर नागरिकांनी जो पाठींबा दर्शवला व आम्‍ही तुमच्‍या सोबत असल्‍याची जाणीव करून दिली त्‍या बद्दल त्‍या सर्वांचे मनापासून आभार व्‍यक्‍त करतो. माझ्या पत्रकारितेला पाठबळ देणारे, तसेच माझ्यावर प्रेम करणारे, आपुलकी आणि विश्‍वास ठेवणारे सर्वजण मला केव्‍हाही संपर्क साधून योग्‍य अथवा अयोग्‍य काय याबद्दल हक्‍काने सूचना करू शकतात, भेटू शकतात, मार्गदर्शन करू शकतात, तो त्‍यांचा हक्‍क आहे.

अर्थातच मागील पत्रकारितेच्‍या १८ वर्षात ओळखीचा असो किंवा अनोळखी असो कोणालाही अरेरावी किंवा मन दुखावेल अशी भाषा वापरलेली नाही किंवा अहंकारी भाषा वापरलेली नाही. उलट भेटलेल्‍या किंवा संपर्क साधणाऱ्या प्रत्‍येकाचा योग्‍य तो आदर आणि सन्‍मान करूनच त्‍याचे म्‍हण्‍णे ऐकून घेतलेले आहे. पुढेही लोकशाही मान्‍य असणाऱ्या प्रत्‍येकाचा योग्‍य तो आदर ठेवला जाईलच. मात्र सर्वसामान्‍य जनतेचे प्रश्‍न रोखठोकपणे मांडतांना कोणाचीच हुकूमशाही, दडपशाही, गुंडगिरी सहन केली जाणार नाही. शिवाय दबाव टाकणारे, कटकारस्‍थान रचणारे, धमक्‍या देणारे व लावालावी करणाऱ्या बांडगुळांचा योग्‍य तो समाचार घेतला जाईल, अर्थातच या बांडगुळांचे डोके ठिकाणावर नाही आल्‍यास त्‍यांच्‍या मुळव्‍याधाचा उपचार तिखट मिरचीने केला जाईल यात शंका नाही.

परवेज पठाण,
संपादक, एल्‍गार न्‍यूज
9890515043


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!