एल्गार न्यूज विशेष :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील प्लॉटींगवाल्यांनी गेल्या वर्षी बातमीचा राग मनात धरून दुसऱ्याच दिवशी एल्गार न्यूज चे संपादक परवेज पठाण यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता, यावेळी त्यांनी दडपशाही आणि दादागिरी करून कार्यालयाचे नुकसानही केले होते. (तेव्हा दुसऱ्याच दिवशी बातमी प्रकाशित झालेली आहे), तेव्हा गावातील सर्व समाजातील अनेक मान्यवरांनी तसेच 2 स्थानिक पत्रकारांनी वारंवार केलेल्या विनंतीला मान देवून गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते. सदरील घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे दबाव आणि दडपशाही करण्यासाठी आलेले जवळपास 40 ते 50 लोक हे सर्व संपादकांच्या समाजाचेच होते. घटनेच्या नंतर यापैकी अनेकांना इतर मान्यवरांनी विचारले असता आम्ही फक्त सोबत आलो होतो, असं काही होईल हे आम्हाला माहितच नव्हतं, असं सांगून स्वत:ला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला.
घटनेच्या काही दिवसांनी सदरील लोकांनी स्वत: न येता इतर मान्यवरांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष माफीचा प्रयत्न केला होता, मात्र ही अप्रत्यक्ष माफी अमान्य करण्यात आली होती. परंतू आता या प्लॉटींगवाल्यांपैकी काही जणांनी स्वखुशीने प्रत्यक्ष कार्यालयात येवून माफी मागितली आहे. शिवाय झालेला प्रकार निषेधार्हच होता तसेच संपादकांनी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठलीही मागणी किंवा अपेक्षा व्यक्त केली नसतांना त्यांना बदनाम करण्याचा जो काही केवीलवाणा प्रयत्न झाला तो सुध्दा पूर्णत: चुकीचाच होता हे सुध्दा त्यांनी उपस्थित मान्यवरांसमोर स्पष्टपणे मान्य केले. संपादकांना मागील काळात झालेल्या मानसिक त्रासाबद्दल सुध्दा त्यांनी माफी मागितली आहे. यामुळे “सत्य परेशान हो सकता है पराजित नही” हे पुन्हा सिध्द झाले. राहीला प्रश्न उर्वरित हल्लेखोरांचा तर उर्वरित राहीलेल्या लोकांना जो पर्यंत पश्चाताप झालाय असे स्पष्ट दिसून येत नाही तो पर्यंत विषय संपणार नाही हे सुध्दा तितकेच खरे.
सदरील घटनेला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खरं तर हा विषय अत्यंत तिखट शब्दात आता पुन्हा सविस्तर न्यूजच्या माध्यमातून मांडायचा होता, परंतू गावातील विविध समाजातील आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेल्या विनंतीचा मान राखावा लागत आहे, त्यामुळे हा विषय थोडं संयमाने आणि Soft भाषेत मांडण्यात येत आहे… शेवटी एवढंच की…
जिनके घर शिशे के होते है
वो दूसरो पर पत्थर मारा नही करते
और जो बारूद के ढेर पर बैठे होते है
वो चिंगारीयों से खेला नही करते…
आभार :-
गेल्या वर्षी हल्ला झाल्यानंतर राज्यभरातील पत्रकारांनी जो प्रचंड पाठींबा दर्शवला त्याबद्दल राज्यातील समस्त पत्रकारांचे मनापासून आभार. तसेच पुणे येथील वकील बांधवांनी सुध्दा कॉल करून कोर्टात आपला केस आम्ही मोफत लढू, काहीही मदत लागली तर आवश्य कॉल करा, आमचा वकीलांचा ग्रुप तुमच्या सोबत आहे असे सांगून जे पाठबळ दिले त्याबद्दल समस्त वकील बांधवांचे आभार. शिवाय सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, डॉक्टर, व्यापारी बांधव, मित्र, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनीही प्रत्यक्ष भेटून अथवा कॉल करून आम्ही तुमच्या सोबत असल्याबाबत जी काही भावना व्यक्त केली, मानसिक पाठबळ दिले व कुठल्याही प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवली त्या सर्वांचे मनापासून आभार…
- परवेज पठाण (B.M.C.J.)
संपादक, एल्गार न्यूज