Your Alt Text

शिवसेना उपजिल्‍हा प्रमुखपदी बापूसाहेब आर्दड तर घनसावंगी तालुका प्रमुखपदी अनिरूध्‍द शिंदे यांची नियुक्‍ती

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते तथा माजी तालुकाप्रमुख बापूसाहेब आर्दड यांची जालना उपजिल्‍हा प्रमुख पदी नियुक्‍ती करण्‍यात आली असून घनसावंगी तालुका प्रमुखपदी माजी पंचायत समिती सदस्‍य अनिरूद्ध शिंदे यांची नियुक्‍ती पक्षाकडून करण्‍यात आली आहे.

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी सदरील नियुक्‍ती केली असून आपल्‍या नेतृत्‍वगुणांमुळे व पक्षनिष्‍ठेमुळे संघटना अधिक बळकट होईल, कार्यकर्त्‍यांना नवे बळ मिळेल आणि जनतेच्‍या प्रश्‍नांना न्‍याय देण्‍यासाठी निश्चितच सक्षम कार्य उभे राहील असा विश्‍वास पक्षाच्‍या वतीने व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

पक्षाचे मुख्‍य नेते तथा उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या नेतृत्‍वाखाली तसेच वरिष्‍ठ नेत्‍यांसह घनसावंगी मतदारसंघाचे आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्‍या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेवून कार्य कराल अशी अपेक्षा पक्षाकडून व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

नवनियुक्‍त जालना उपजिल्‍हाप्रमुखपदी बापूसाहेब आर्दड व घनसावंगी तालुकाप्रमुखपदी अनिरूध्‍द शिंदे यांची निवड झाल्‍याबद्दल दोघांना पक्षाचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक व मित्र परिवाराच्‍या वतीने अभिनंदनासह शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या आहेत.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!