एल्गार न्यूज :-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. आज सकाळी (दि.२८) रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भिषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित पवार यांच्यासह एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून विमानाने बारामतीकडे येत होते, विमान बारामती विमान तळावर उतरत असतांना अपघात होवून विमान जवळच्या शेतात कोसळले. डीजीसीएने या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवला होता. आपले मत स्पष्ट आणि परखडपणे मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. प्रशासनाकीय व्यवस्थेवर सुध्दा त्यांची चांगली पकड होती. सकाळी लवकर उठून रात्री उशीरापर्यंत काम करणारा अभ्यासू नेता म्हणून ते परिचित होते.
पवार कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्रावर दुखाचा डोंगर कोसळला आहे, सदरील अचानकपणे घडलेली ही दुर्दैवी घटना राज्यातील प्रत्येक माणसाला अस्वस्थ करणारी आहे. अजित पवार व इतर मृत्यू झालेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली…