एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
अनेक वर्षांपासून हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले कुंभार पिंपळगांव येथील शिवसैनिक संदिप (बबलू) कंटुले यांची घनसावंगी तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एकनिष्ठ शिवसैनिक, ग्रामपंचायत सदस्य आणि कुंभार पिंपळगांवसह तालुक्यात शिवसेनेचे चाणक्य असलेले संदिप उर्फ बबलू कंटुले यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरून घनसावंगी तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
फक्त शिवसेनाच !
संदिप (बबलू) कंटुले यांना शालेय जीवनापासूनच शिवसेना आवडत होती, तेव्हापासूनच ते शिवसेनेशी जोडले गेले. सुरूवातीला शिवसैनिक म्हणून त्यानंतर कुंभार पिंपळगांव शहरप्रमुख म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली. यापूर्वी सुध्दा ते ग्रामपंचायत सदस्य होते. पक्षाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केले आहे. शालेय जीवनापासून शिवसेनेशी जुडल्यानंतर आतापर्यंत ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले म्हणजेच पक्ष सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात असो त्यांनी पक्ष सोडला नाही.
कुंभार पिंपळगांव शहर असो, सर्कल असो किंवा तालुक्यात पक्षाच्या प्रचार प्रसाराचा विषय असो संदिप कंटुले हे नेहमी अग्रस्थानी असतात. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात संदिप कंटुले हे समोर येवून पक्षासाठी प्रयत्न करत असतातच, परंतू बऱ्याचदा पक्ष वाढीसाठी पडद्यामागे राहून सुध्दा चाणक्याप्रमाणे त्यांची रणनिती असते. त्यामुळे बऱ्याचदा पक्षाला मोठा फायदा झालेला आहे. संदिप कंटुले यांनी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी केलेल्या कार्यामुळे आता त्यांची घनसावंगी तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील चाणक्य !
कुंभार पिंपळगांवसह तालुक्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींमध्ये संदिप कंटुले यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग दिसून येतो. विशेष करून शिवसेनेच्या तालुक्यातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग अनेक वर्षांपासून दिसून येतो. कदाचित त्यांना पडद्यामागील चाणक्य म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता याच चाणक्याच्या हाती तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
संदिप कंटुले यांच्या मोबाईलवर असलेली डायलर टोन नुसार “उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…” या गिताप्रमाणे तालुक्यात शिवसैनिकांच्या मनात आणि सर्वसामान्यांच्या जीवनात मशालीच्या माध्यमातून उजेड करून पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ते आता अधिक जोमाने प्रयत्नशील राहतील असं म्हणायला हरकत नाही.
संदिप (बबलू) कंटुले यांची घनसावंगी तालुकाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना उपनेते व परभणी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार संजय (बंडू) जाधव, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, सहसंपर्कप्रमुख हिकमतदादा उढाण, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, युवासेना नेते विनायक चोथे, माजी ता.प्रमुख उध्दव मरकड, मा.जि.प.सदस्य अंशीराम कंटुले तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, शिवसेना शाखाप्रमुख, शिवसेना, युवासेना, दलित आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, महिला आघाडीसह घनसावंगी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.