एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मृत्यूच्या दाढेतून परत आल्याबद्दल आपण अनेकदा ऐकले असेल परंतू मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जिवंत होणे हे ऐकले आहे का ? आणि ते पण 18 तासानंतर ? परंतू हे खरे आहे एका वृध्द महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तब्बल 18 तासानंतर सदरील महिला जिवंत झाल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यातील नीमा चांदपुरा मध्ये राहणारी वृध्द महिला रामवती देवी काही दिवसांपूर्वी घनशाम व मुरारी या दोन मुलांसोबत छत्तीसगडला फिरायला गेली होती. छत्तीसगड मधील गढवा जिल्ह्यात तीचे नातेवाईक राहतात. तिथे राहत असतांनाच रामवती देवी अचानक आजारी पडली, तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. अर्थात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत रामवती देवीच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह आपल्या गावी म्हणजेच बिहार मध्ये आणून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. छत्तीसगड मधून तिचा मृतदेह घेवून कुटुंबिय बिहारच्या दिशेने निघाले, तब्बल 18 तास उलटल्यानंतर बिहार राज्याच्या सिमेत प्रवेश केल्यानंतर कुटुंबियांना रामवती देवीच्या शरीरात हालचाल दिसून आली. तात्काळ कुटुंबियांनी बेगुसराय येथील दवाखान्यात तिला दाखल केले.
डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितले की अजुनही रामदेवी मध्ये जीव बाकी आहे म्हणजेच रामवती देवी अजूनही जिवंत आहे, डॉक्टरांनी तात्काळ आयसीयू मध्ये तिला अॅडमिट करून तिच्यावर उपचार सुरू केले. रामवती देवीच्या प्रकृती मध्ये सुधारणा होत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. सदरील डॉक्टरांना सुध्दा हा प्रकार पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. सदरील प्रकरण मीडिया किंवा सोशल मीडिया च्या माध्यमातून बरेच व्हायरल होत आहे. अर्थातच वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुध्दा पहायला मिळत आहेत.
इतर महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.