एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माजेद पठाण यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील नियुक्ती माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलभैय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संपतराव टकले यांनी केली आहे.
माजेद पठाण हे गेल्या बऱ्याच कालावधीपासून भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यासह जिल्हाभरात त्यांचा चांगला जनसंपर्क असून त्यांच्या निवडीमुळे पक्षाला नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
माजेद पठाण यांच्या नियुक्ती बद्दल स्वप्नीलजी रामदासी, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे, उपाध्यक्ष कैलास शेळके, फारूक दफेदार, रमेश शिंदे, रमेश काळे, पांडूरंग आर्दड, अंकुश कंटुले, बाळराजे बहीर, रामेश्वर सोळंके, अलीम शेख, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.