एल्गार न्यूज (परवेज पठाण)
माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या ऑडीओ क्लिपचे प्रकरण चांगलेच तापतांना दिसत आहे. विविध माध्यमांमध्ये आलेल्या कथित ऑडिओ क्लिप मध्ये माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांना आमदार बबनराव लोणीकर शिवीगाळ करत असल्याचे समोर आले आहे.
सदरील ऑडीओ क्लिप मध्ये झालेल्या अर्वाच्च भाषेतील शिवीगाळ मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ.बबनराव लोणीकर यांचा प्रतिकात्मक फोटो गाढवाला लावून त्याची धिंड काढली.
दि. 16 रोजी अंबड – पाथरी महामार्गावर कुंभार पिंपळगांव येथील कृषि उत्पन्न बाजार समिती समोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी बबनराव लोणीकर यांच्या विरूध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी गाढवाला बबनराव लोणीकर यांचा फोटो लावून फोटोला चपलेने मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर हे दोघेही माजी मंत्री आहेत आणि सध्याचे रनिंग आमदार आहेत, मात्र ऑडीओ क्लिपमध्ये एकीकडे राजेश टोपे सुसंस्कृतपणे बोलत आहे तर दुसरीकडे बबनराव लोणीकरांनी शिवराळ भाषा वापरून त्यांची मानसिक दिवाळखोरी निघाल्याचे दाखवून दिले आहे असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
याबाबत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब चिमणे यांनी सांगितले की, एका माजी मंत्र्याने इतकी शिवराळ भाषा वापरणे म्हणजे अज्ञानपणाचा कळस आहे. शिक्षणाचा अभाव आहे. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो असे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार देशमुख, कल्याणराव सपाटे, तात्यासाहेब चिमणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राऊत, रविंद्र आर्दड, अजीमभाई पठाण, बन्सी शेळके, रफीक कुरेशी, सिध्दार्थ गाढे, ताहेर पठाण, बाळू कंटुले, सुधाकर साबळे, बाळासाहेब तांगडे, बाळूसेठ लोया, बबलू गुजर, शिवाजी टेहळे, विजय कंटुले, जनार्धन नाईक, विजयानंद वाहुळे, भिमराव पराडे, हमीद शेख, विठ्ठल नाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.