व्हाट्सअॅप ग्रुप
जॉईन करा.
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या जालना उपजिल्हा प्रमुखपदी कुंभार पिंपळगांव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते रफीक कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील नियुक्ती ही आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे उपजिल्हा प्रमुख बापुसाहेब आर्दड यांनी केली आहे. शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेवून कार्य कराल असा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
रफीक कुरेशी हे सध्या कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायत सदस्य असून गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सहभागी असतात, रफीक कुरेशी यांच्या नियुक्ती बद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
व्हाट्सअॅप ग्रुप
जॉईन करा.