Your Alt Text

लोकं काय म्‍हणू राहिलेत रे बाबा ? राज्‍यात कोणाचं सरकार येतंय हे नंतर पाहू, आधी हे पाहू द्या की आमच्‍या मतदारसंघात कोण निवडून येतंय ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
यंदाची विधानसभेची निवडणूक अत्‍यंत अटीतटीची झालेली आहे यात शंका नाही. काही मतदारसंघात रेकॉर्डब्रेक झालेले मतदान अनेकांना आश्‍चर्याचा धक्‍का देणारे ठरले आहे. यंदाच्‍या निवडणुकीत विकासाचे मुद्दे आणि राजकीय समिकरणे तर होतीच परंतू त्‍यासोबतच सामाजिक आणि जातीय समिकरणे सुध्‍दा प्रभावी ठरण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

एक तर या निवडणुकीत पक्षांची वाढलेली संख्‍या, गट तट व मोठ्या प्रमाणावर उभे राहिलेल्‍या उमेदवारांची संख्‍या ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. तर दुसरीकडे सध्‍याची राजकीय परिस्थिती पाहता मतदारांनी शांतपणे राहून केलेले मतदान अनेकांना अस्‍वस्‍थ करणारे ठरले आहे. मतदारांनी कोणालाच “हम आपके है कौन ?” असं म्‍हटलं नाही, उलट सर्वांनाच “हम तुम्‍हारे है सनम” असं म्‍हटल्‍याने अनेकांना जास्‍त टेंशन आल्‍याचे दिसत आहे.

बुंदी वाटप ?

कोणी कितीही नाही म्‍हटले तरी यंदाच्‍या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बुंदी वाटप झाली आहे हे नाकारता येत नाही, फक्‍त ही बुंदी किती प्रमाणात वाटण्‍यात आली हे सांगता येत नसले तरी आधीच्‍या तुलनेत ही बुंदी थोडी जास्‍त होती असे ऐकायला मिळत आहे. अर्थातच अनेकांनी अर्थपूर्ण बुंदी वाटल्‍याने कोणाची बुंदी कोणाला गोड लागते किंवा बुंदीचा काहीच फरक पडत नाही हे सांगणे अवघड आहे.

शांततेत कार्यक्रम !

खरं तर या निवडणुकीत मतदारांनी शांत राहून जो सुज्ञपणा दाखवला तो अनेकांना अस्‍वस्‍थ करणारा ठरला असं म्‍हणायला हरकत नाही, कारण यंदा निवडणुक प्रचाराच्‍या काळात मतदारांनी उमेदवाराविषयी बोलणे टाळल्‍याचे दिसून आले, नेहमी प्रमाणे चौकात उभं राहून चर्चा करणे, कट्ट्यावर बसून राजकीय गप्‍पा मारणे, हा निवडून येणार का तो निवडून येणार याची चर्चा करणे, याला मतदान करा किंवा त्‍याला मतदान करा याबाबत भाष्‍य करणे टाळल्‍याचे दिसून आले, अर्थातच मतदानाच्‍या दिवशी शांतपणे जावून ज्‍याला मतदान करायचे त्‍याला करणे आणि नीट घरी येणे याला प्रधान्‍य दिल्‍याचे दिसून आले.

उत्‍सुकता की चिंता !

कार्यकर्त्‍यांसह मतदारांना आजघडीला ही चिंता नाही की, येत्‍या काही दिवसात राज्‍यात कोणाचं सरकार येणार आहे तर त्‍यांना राहून राहून हा प्रश्‍न सतावतोय की त्‍यांच्‍या मतदारसंघात कोण निवडून येतंय ? अर्थातच अनेक मतदारसंघात झालेले अटीतटीचे सामने, काही ठिकाणी झालेले रेकॉर्डब्रेक मतदान, मतांची विभागणी, निर्माण झालेली वेगवेगळी समिकरणे, गटातटाचे राजकारण यामुळे कोणता उमेदवार निवडून येईल याबाबत काहींना उत्‍सुकता तर काहींना चिंता लागली आहे.

धाब्‍यांना सुगीचे दिवस !

निवडणुकीच्‍या काळात गावाबाहेरील लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्‍या पार्कला अर्थातच हॉटेल धाब्‍यांना सुगीचे दिवस असतात असे म्‍हटले जाते. अर्थातच तशीच काही परिस्थिती यंदाही दिसून आली. कार्यकर्ते, समर्थक व काही मतदारांनी वाहत्‍या गंगेत हात धुवून घेतल्‍याने हॉटेल – धाबे रात्री उशीरापर्यंत सुरू असल्‍याचे दिसून आले. अर्थातच निकाल लागेपर्यंत सुध्‍दा कमी अधिक प्रमाणात कधी खुशी तर कधी गम मध्‍ये आणि रात्री चांगली झोप येईल या गैरसमजातून अनेकजण जात असल्‍याने हॉटेल धाबा चालकांसाठी “सोने पे सुहागा” झाल्‍याचे दिसत आहे. बाकी ज्‍यांना या काळात प्‍यायची सवयच लागली आहे त्‍यांना यापुढील काळात स्‍वत:च्‍या पैशाचीच प्‍यावी लागणार असं म्‍हणायला हरकत नाही…. जागते रहो… किसीके भरोसे मत रहो….


इतर बातम्‍या खाली पहा…


fasfasdfadfsadsfasd
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!