एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून यामध्ये घनसावंगीची जागा सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. त्यासाठी अल्पसंख्याक समाजाने ना.अजित पवार यांचे हात बळकट करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडे यांनी केले.
इद्रिस नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी दौऱ्या अंतर्गत घनसांगवी येथे दि.10 रोजी अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इद्रिस नाईकवाडे हे होते तर प्रमूख पाहूणे म्हणून रविंद्र तौर (राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती जालना), शाह आलम खान (जालना जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग) रविंद्र खरात, राज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण कंटूले, राम घोगरे, ग्रा.प.सदस्य फिरोज कुरेशी, अलीम पटेल, हैदर खान, फैयाज बागवान, भास्कर वराडे, फेरोज पठाण, हारूण पठाण, चंद्रकांत कारके (जालना जिल्हा कार्याध्यक्ष) सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडे यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले असून ते निर्णय तुम्ही गावागावात जाऊन लोकांना सांगावे तसेच आपल्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठीमागे खंबीपणे उभे रहावे.
तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार निवडून आलेला आहे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून यामध्ये घनसावंगीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जालना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रविंद्र तौर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या हिताचे अनेक प्रश्न सोडवले असुन पुढील प्रश्न सोडविण्याचे काम अजितदादा करणार आहेत, त्यासाठी मुस्लिम समाजाने अजित दादांना ताकत द्यावी या साठी खंबीर पणे राष्ट्रवादी काँगेसच्या पाठीमागे उभे रहावे. घनसावंगी तालुका राष्ट्रवादी काँगेसचा बालेकिल्ला असुन यावेळी पण ही जागा राष्ट्रवादीच लढविणार आणि जिंकणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.