कुंभार पिंपळगांव :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे सर्व पत्रकारांची दि.25 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीमध्ये मागील काळात घडलेल्या घडामोडी आणि पुढील वाटचालीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी आपले मत व्यक्त केले. विशेष करून पत्रकारांना कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष धमकी किंवा दबाव सहन केला जाणार नाही. सर्व पत्रकारांची एकता अबाधित असून कोणत्याही पत्रकार बांधवाला धमकी देवून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व पत्रकार त्या पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी स्पष्ट भुमिका उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.
यावेळी सर्वश्री पत्रकार दिगंबर गुजर, परवेज पठाण, सुरेश दाड, लक्ष्मण बिलोरे, किशोर शिंदे, विठ्ठल काळे, अजय गाढे, गणेश ओझा, भागवत बोटे, संभाजी कांबळे, कुलदिप पवार यांची उपस्थित होती, तर विष्णूभाऊ आर्दड व अशोक कंटुले यांना काही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही मात्र त्यांनी बैठकीत पत्रकारांच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेशी पूर्ण सहमती दाखवत आपला पाठींबा दर्शवला.