Your Alt Text

बदलापूर मधील शाळकरी मुलीवर अत्‍याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
ठाणे जिल्‍ह्यातील बदलापूर मधील शाळकरी मुलीवर लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्‍यात यावी व इतर शाळा महाविद्यालयीन मुलींच्‍या सुरक्षेविषयी ठोस उपाययोजना करावी, जेणेकरून मुलींना भयमुक्‍त जीवन जगता येईल. शिवाय त्‍यांना आपण स्‍वतंत्र देशाचे नागरिक म्‍हणून मुक्‍तपणे शिक्षण घेता येईल.

सदरील प्रकरणातील आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करत त्‍याला फाशीची शिक्षा देण्‍यात यावी, जेणेकरून इतर कोणत्‍याच नराधमाचे असे दुश्‍कर्म करण्‍याचे धाडस होणार नाही. अशा मागणीचे निवेदन राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्‍या वतीने कुंभार पिंपळगांव येथील पोलीस चौकीला देण्‍यात आले आहे.

यावेळी रविंद्र आर्दड, दिलीप राऊत, नाजेम पठाण, ताहेर पठाण, सिध्‍दार्थ गाढे, बाळू कंटुले, विष्‍णू शिंदे, अनमोल गाढे, सुशील साबळे, एकनाथ चव्‍हाण, हमीद शेख, भरत कंटुले, शिवाजी कंटुले, पवन पांचाळ, दिलीप शिंदे, नितीन तौर, रमेश शिंदे, प्रविण आर्दड, सीरहाज चाऊस यांच्‍यासह मोठ्या संख्‍येने शाळकरी मुली उपस्थित होत्‍या.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!