Your Alt Text

लोकशाहिर आण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्‍त व मनोज जरांगे पाटील यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त कुं.पिंपळगांव येथे भव्‍य रक्‍तदान शिबीर संपन्‍न !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे लोकशाहिर आण्‍णाभाऊ साठे यांच्‍या जयंती निमित्‍त व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त दि.1 रोजी भव्‍य रक्‍तदान शिबीर व वृक्षवाटप कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या संपन्‍न झाला.

सदरील रक्‍तदान शिबीरात कुंभार पिंपळगांवसह परिसरातील तब्‍बल 108 रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान केले. यामध्‍ये 3 महिलांचा देखील समावेश आहे. रक्‍तदान केलेल्‍या सर्व जाती धर्मातील रक्‍तदात्‍यांना एक आंब्‍याचे वृक्ष भेट देण्‍यात आले. कुंभार पिंपळगांवसह परिसरातील गावातील बांधवांनी उत्‍स्‍फुर्तरित्‍या रक्‍तदान शिबीरात येवून रक्‍तदान केले.

कुंभार पिंपळगांवसह परिसरातील विविध गावातील बांधवांनी या कार्यक्रमासाठी प्रत्‍यक्ष, अप्रत्‍यक्षरित्‍या सहकार्य व परिश्रम घेतल्‍याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले आहे. तसेच तालुक्‍यातील ज्‍या बांधवांनी कार्यक्रमस्‍थळी भेट दिली त्‍यांचे सुध्‍दा आभार व्‍यक्‍त केले आहे. सदरील कार्यक्रम सर्वधर्मीय व सर्व जातीय समाज तसेच व्‍यापारी बांधव कुंभार पिंपळगांव यांच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आला होता.

आयोजकांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून सदरील कार्यक्रम आयोजित करून तब्‍बल 108 रक्‍दात्‍यांनी या शिबीरात रक्‍तदान केल्‍याने तसेच रक्‍तदात्‍यांना वृक्षाचे वाटप करून एक चांगला संदेश दिल्‍याने कुंभार पिंपळगांवसह परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे अभिनंदन केले आहे.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!