केंद्र शासनाने पीएम किसान सम्मान निधी योजने अंतर्गत 2000 चा हप्ता यापुढे सुरू ठेवण्यासाठी काही नियम केले आहेत, त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्यांना यापुढे 2000 चा हप्ता सुरू ठेवायचा आहे त्यांना E-kyc करणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते अधारशी लिंक करणेही गरजेचे आहे. ज्यांची लँड सिडींग किंवा जमीन पीएम किसान खात्याशी लिंक नाही त्यांनी लिंक करणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाने खऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने सदरील नियम केले आहेत. जे लाभार्थी ई-केवायसी करणे, बँक खाते आधारशी लिंक करणे आणि लँड सिडींग करणार नाहीत त्यांना 2 हजाराचा हप्ता येणार नाही. ज्यांनी यापूर्वी तिन्ही गोष्टी केलेल्या आहेत त्यांना कोणतीही अडचण नाही.