शासनाने E-kyc करण्याची सुविधा ई-सेवा केंद्रावर तर केली आहेच परंतू आपल्या मोबाईलवर सुध्दा ही सेवा उपलबध आहे. त्यासाठी तुम्हाला शासनाच्या https://pmkisan.gov.in अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
सदरील वेबसाईटवर फार्मर कॉर्नर पर्याय दिसेल, तेथे e-kyc वर क्लिक करावे, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकावा, त्यानंतर आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. OTP यशस्वीरित्या प्रविष्ट केल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
येथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, मोबाईल वर ई-केवायसी करण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला CSC किंवा ई-सेवा केंद्रावर जावे लागेल.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.