गॅसवर धावणारी कोणती बाईक येणार ? किंमत किती ?

मीडिया रिपोर्टनुसार भारतीय प्रमुख कंपनी बजाज आपली सीएनजी वर आधारीत बाईक लॉन्‍च करण्‍याच्‍या तयारीत आहे. फक्‍त सीएनजीच नाही तर एलपीजी किंवा इथेनॉलवर सुध्‍दा कंपनीचे काम सुरू आहे. मात्र तुर्तास सीएनजीवर धावणारी बाईक मार्केट मध्‍ये उतरवण्‍यारी तयारी सुरू आहे.

सीएनजी वर धावणारी बाईक जर मार्केट मध्‍ये आल्‍यास इतर कंपन्‍यांना फटका बसू शकतो, कारण सीएनजी बाईकमुळे एकतर पेट्रोलवरील खर्च कमी होईल आणि मायलेजही वाढेल, त्‍यामुळे लोकांचा कल या बाईककडे असू शकतो.

सध्‍या कंपनीने सीएनजी बाईक लॉन्‍च करण्‍याच्‍या बाबतीत अधिकृत अशी घोषणा केलेली नाही, परंतू अशा प्रकारची बाईक मार्केट मध्‍ये उतरवण्‍याचे संकेत दिले आहेत, अर्थातच बाईक लॉन्‍च करण्‍याची तारीख स्‍पष्‍ट करण्‍यात आलेली नसल्‍यामुळे त्‍याची किंमतही जाहीर करण्‍यात आलेली नाही. मात्र लवकरच अशा प्रकारची बाईक रस्‍त्‍यावर दिसेल अशी माहिती माध्‍यमांमधून व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!