Your Alt Text

एखाद्या सार्वजनिक प्रश्‍न, समस्‍येबाबत तुमची भावना किंवा रोखठोक मत व्‍यक्‍त करायचे असेल तर तुम्‍हाला फोटोसह आम्‍ही प्रसिध्‍दी देवू ! कसे पाठवायचे ते वाचा.. | Your Opinion on Public Issues

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
प्रत्‍येक माणसाच्‍या मनात काही प्रश्‍न, समस्‍या असतात, प्रत्‍येकाच्‍या काही भावना किंवा मत असते. अनेकदा एखादा प्रश्‍न खूप गंभीर असतो परंतू त्‍याकडे कोणीही लक्ष देत नाही, अशा वेळी आपल्‍या मनात खदखद असते, मात्र व्‍यक्‍त करायचे माध्‍यम नसते.

सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताचे अनेक प्रश्‍न, समस्‍या आहेत, ज्‍याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. उदाहरणार्थ आरोग्‍यावर होणारा खर्च, आरोग्‍याचा बाजार, शिक्षणावर होणारा खर्च, शिक्षणाचा बाजार, पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍या, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारांचे प्रश्‍न, महिलांचे प्रश्‍न, एस.टी. कामगार व इतर कामगारांचे प्रश्‍न, इतर कष्‍टकऱ्यांचे प्रश्‍न आहेत.

तसेच पत्रकारांचे प्रश्‍न, उद्योग व्‍यवसायाचे प्रश्‍न, कर्ज मिळत नसल्‍याचे प्रश्‍न, योजनांची अंमलबजावणी, ग्रामीण भागात उद्योग न येण्‍याची कारणे, प्रोत्‍साहन न मिळण्‍याचे कारणे, लग्‍नाला मुली मिळत नसल्‍याचे प्रश्‍न किंवा इतर अनेक क्षेत्रातील प्रश्‍न आहेत.

बऱ्याचदा आपल्‍याला वाटते की, एखाद्या सार्वजनिक प्रश्‍नावर आपण आपली भावना सांगावी, मनातली खदखद व्‍यक्‍त करावी, परंतू व्‍यासपीठ उपलब्‍ध नसते, मात्र आता चिंता करण्‍याची आवश्‍यकता नाही, आपणास कोणत्‍याही प्रकारच्‍या सार्वजनिक प्रश्‍नाविषयी काही रोखठोक मत, भावना व्‍यक्‍त करायची असल्‍यास आता त्‍यासाठी आम्‍ही आपणास मोफत प्रसिध्‍दी देवू.

आपण कोणत्‍याही क्षेत्रातील असू द्या, आपण शेतकरी, व्‍यापारी, प्राध्‍यापक, शिक्षक, उद्योजक, कामगार, लेखक किंवा तज्ञ किंवा सर्वसामान्‍य नागरिक असाल तरीही तुम्‍ही तुमचे मत व्‍यक्‍त करू शकता, तसेच आपण एखाद्या वर्तमानपत्राचे किंवा चॅनलचे प्रतिनिधी असाल तरीही तुम्‍ही एक नागरिक किंवा पत्रकार म्‍हणून येथे तुमची भावना किंवा मत व्‍यक्‍त करू शकता.

काही अट आहे का ?

तुम्‍हाला कोणत्‍याही प्रश्‍न किंवा समस्‍येवर मत व्‍यक्‍त करायचे असेल तर ते सार्वजनिक असावे, एखाद्या गावापुरते किंवा छोट्याशा क्षेत्रापुरते मर्यादित नसावे, सदरील प्रश्‍न हा राज्‍यातील जनतेचा असावा, म्‍हणजेच तो प्रश्‍न शक्‍यतो राज्‍यातील जनतेशी निगडीत असावा.

एल्‍गार न्‍यूजला तुमचे मत कसे पाठवायचे ?

तुम्‍हाला एल्‍गार न्‍यूजला तुमची भावना किंवा मत पाठवण्‍यासाठी तुमच्‍या मोबाईलवर 500 ते 1000 शब्‍दांमध्‍ये मजकूर (आर्टीकल) टाईप करावा, सदरील टाईप केलेला मजकूर 7057826573 या व्‍हाट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. सोबत तुमचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो, तुमचे नाव, गांव, तालुका, जिल्‍हा लिहून पाठवावा. कागदावर लिहून ते पाठवल्‍यास स्विकारले जाणार नाही. तुमचे मत (आर्टीकल) मोफत प्रकाशित केले जाईल, शिवाय याचे कोणतेही मानधन मिळणार नाही.

तुमचे मत किंवा आर्टीकल पाठवतांना आवश्‍कता असेल तर एखाद्या बांधवाला तो दाखवून काही दुरूस्‍ती असल्‍यास करून घ्‍यावी, व त्‍यानंतर आम्‍हाला वर दिलेल्‍या व्‍हाट्सअॅप क्रमांकावर पाठवावे.

दर दिवशी एका व्‍यक्‍तीचा आर्टीकल प्रकाशित करण्‍याचा प्रयत्‍न आहे, असे एक आठवडा करून पाहीले जाणार नाही, त्‍यानंतर पुढचा निर्णय घेण्‍यात येईल. कोणत्‍याही प्रकारचा आर्टीकल किंवा मजकूर प्रकाशित करण्‍याचा किंवा नाकारण्‍याचा अधिकार एल्‍गार न्‍यूजने राखून ठेवला आहे, कोणी पाठवलेला मजकूर प्रकाशित करणे आमच्‍यावर बंधनकारक नाही.

मजकूर लिहीतांना कोणत्‍याही धर्म, जात, समाज, गट किंवा इतर कोणाच्‍याही भावना दुखावल्‍या जाणार नाही, अशा प्रकारचा असावा, मजकूर रोखठोक लिहीता येईल परंतू आक्षेपार्ह नसावा. एवढी सविस्‍तर माहिती देण्‍याचे कारण एवढेच की, कोणाचाही हिरमोड होवू नये किंवा गैरसमज होवू नये हा आहे.

आम्‍ही कोणत्‍याही पक्ष, संघटनेचे सदस्‍य नसून कोणाचेही समर्थक किंवा विरोधक नाहीत, मात्र
तुम्‍ही सरकारच्‍या बाजूने किंवा सरकारच्‍या धोरणाच्‍या विरोधात तुमचे काही मत असेल तर ते सुध्‍दा मांडू शकता.

तर मग, असेल काही मनात खदखद तर व्‍यक्‍त करा आणि आम्‍हाला वरील व्‍हाट्सअॅप क्रमांकावर पाठवा, आम्‍ही आमच्‍या नियमात बसत असल्‍यास त्‍यास नक्‍कीच प्रसिध्‍दी देवू… तुमच्‍या आर्टीकलचे स्‍वागत आहे… धन्‍यवाद….

– संपादक, एल्‍गार न्‍यूज


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!