एल्गार न्यूज :-
Whatsapp stop Support for old Version : आजकाल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअॅप हमखास दिसून येतो, देशात व्हाट्सअॅपचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. व्हाट्सअॅपच्या माध्यमातून मॅसेज, फोटो, व्हिडीओ, पीडीएफ इत्यादी सहज पाठवणे शक्य असल्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
व्हाट्सअॅप नेहमी आपल्या युजर्ससाठी नवनवीन पर्याय उपलब्ध करत असतो. शिवाय आपले व्हर्जन अपग्रेड सुध्दा करत असतो. आता व्हाट्सअॅपने काही फोनवर सपोर्ट सिस्टीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अर्थात संबंधित मोबाईलवर सपोर्ट सिस्टीम मिळणार नाही.
कोणाचे व्हाट्सअॅप बंद होणार ?
व्हाट्सअॅप थेट बंद न होता जुन्या फोनवर सपोर्ट बंद करणार आहे, म्हणजेच व्हाट्सअॅपवर येणाऱ्या विविध सुविधा किंवा तांत्रिक अडचणीसाठी सपोर्ट मिळणार नाही. जुने म्हणजे जे मोबाईल 4.1 आणि त्यापेक्षाही जुन्या व्हर्जनवर सुरू आहेत त्यांना सपोर्ट मिळणार नाही.
काम करणे थांबवण्यापूर्वी कंपनी वापरकर्त्यांना सूचित करेल आणि त्यांना व्हाट्सअॅप वापरणे सुरू ठेवण्यासाठी डिव्हाईस अपग्रेड करण्यासही सांगितले जाईल. सपोर्ट सिस्टीम 24 ऑक्टोबर नंतर बंद केले जातील.
Whatsapp stop Support for old Version
कंपनी ऑपरेटींग सिस्टीमच्या नवीन व्हर्जनवर वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत असते. त्यामुळे जुन्या व्हर्जनवर सपोर्ट सिस्टीम बंद करत असते. अनेकांकडे 10 वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त जुने मोबाईल असतात, त्यात जुने व्हर्जन असते. ज्यांच्याकडे मागील काही वर्षात घेतलेले मोबाईल आहेत त्यामध्ये अलीकडच्या काळातील व्हर्जन असल्यामुळे त्यात अडचण नाही.
त्यामुळे व्हाट्सअॅपने घेतलेला निर्णय हा फक्त जुन्या व्हर्जनवर असलेल्या मोबाईलसाठीच आहे. त्यामुळे इतरांनी काळजी करण्याचे कारण नाही.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.