एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
राज्यात विधानसभेच्या निवडणुका संपल्या असून निकालही लागले आहेत. अर्थातच विविध मतदारसंघातून आमदार निवडून आले आहेत. ज्या त्या मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदाराकडून मतदारसंघातील जनतेच्या जशा अपेक्षा असतात त्याच प्रमाणे घनसावंगी मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांकडून सुध्दा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा आहेत.
घनसावंगी मतदारसंघातून पहिल्यांदाच डॉ.हिकमत उढाण हे निवडून आले आहेत. हिकमत उढाण यांना प्रशासकीय आणि मंत्रालयीन कामकाजाचा अनुभव असून वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवाय डॉ.हिकमत उढाण हे महायुतीकडून निवडून आलेले असून राज्यातही महायुतीचे सरकार स्थापन होत असल्याने अर्थातच मतदारसंघात विकास कामे करणे आणि विविध योजना राबविणे त्यांना अधिक सोपे होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
ज्या अर्थी घनसावंगी मतदारसंघातील जनतेने आपले प्रलंबित प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वांगिण विकास करण्यासाठी डॉ.हिकमत उढाण यांना निवडून दिले आहे त्या अर्थी जनतेचे प्रश्न, समस्या आमदार महोदयांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. डॉ.हिकमत उढाण यांना मतदारसंघातील विविध प्रश्न आणि समस्यांची जाणीव असली तरी जनतेच्या भावना सुध्दा त्यांच्या पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
प्रतिकिया पाठवा !
घनसावंगी मतदारसंघात कोणते प्रश्न प्रलंबित आहेत ? कोणत्या समस्या आहेत ? घनसावंगी मतदारसंघाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी प्रामुख्याने काय करणे आवश्यक आहे ? कोणत्या गोष्टींवर फोकस करणे गरजेचे आहे ? यादृष्टीने आपण एल्गार न्यूजला 9890515043 या व्हाट्सअॅप क्रमांकावर आपल्या प्रतिक्रिया 8 ते 10 ओळीत पाठवू शकता.
नवनिर्वाचित आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत याबाबत तुम्ही तुमचं मत मांडू शकता. तुम्ही एखाद्या प्रश्नांवरही 8 ते 10 ओळीत तुमची प्रतिक्रिया देवू शकता किंवा 2 ते 3 प्रश्नांवर किंवा समस्यांवर सुध्दा 8 ते 10 ओळीत एकत्रीत प्रतिक्रिया देवू शकता. एल्गार न्यूज तुमची मते किंवा तुमच्या प्रतिक्रिया प्रकाशित करून आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. एवढंच नव्हे तर येत्या काळातही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी एल्गार न्यूज लेखणीच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे.
तर मग उशीर कशाला, पाठवा तुमच्या प्रतिक्रिया. आज दि.27 पासून उद्या दि.28 सायंकाळ पर्यंत आपल्या प्रतिक्रिया मोबाईलवर मराठीत टाईप करून 9890515043 या व्हाट्सअॅप क्रमांकावर पाठवाव्यात. प्रतिक्रिया पाठवणारा व्यक्ती सत्तेत असो, विरोधक असो, पदाधिकारी असो, व्यापारी, वकील, डॉक्टर, शेतकरी, कामगार, शिक्षक, प्राध्यापक असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो तुम्ही प्रतिक्रिया पाठवू शकता.
प्रतिक्रियेसोबत तुमचे नाव, पद असेल तर पद किंवा तुम्ही जो व्यवसाय करता किंवा काम करता त्याचा उल्लेख करावा. आलेल्या प्रतिक्रियांपैकी काही प्रमुख प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जातील. येणाऱ्या प्रतिक्रियांची संख्या पाहता प्रतिक्रिया किती आणि कोणत्या प्रकाशित करायच्या याचा सर्वस्वी अधिकार एल्गार न्यूजने राखून ठेवला आहे.
आपण एल्गार न्यूजच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन होवू शकता, तसेच आमचा 9890515043 हा व्हाट्सअॅप क्रमांक घनसावंगी मतदारसंघातील तुमच्या व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये अॅड सुध्दा करू शकता.