Your Alt Text

घनसावंगी मतदारसंघातील जो उमेदवार मातंग समाजाचे प्रश्‍न सोडवणार त्‍याच्‍याच पाठीशी उभं राहणार ! – समाजातील युवकांची भावना

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्‍ह्यातील घनसावंगी मतदारसंघात मातंग समाज जवळपास 28,000 असल्‍याचं युवकांचं मत आहे. आमदार व लोकप्रतिनधी निवडून देण्‍यात मातंग समाजाची महत्‍वाची भुमिका आहे. मात्र मातंग समाजाचा वापर फक्‍त मतदानापुरताच होत असून वर्षानुवर्षे समाजाच्‍या समस्‍या जैसेथेच असल्‍याची भावना समाजातील युवकांनी व्‍यक्‍त केली आहे.

मतदारसंघात विधानसभेसाठी इतर अनेक उमेदवार असतात परंतू मातंग समाजाचा उमेदवार नसतो. ज्‍या अर्थी आम्‍ही आमदार निवडून देण्‍यात महत्‍वाची भुमिका निभावतो त्‍या अर्थी संबंधित आमदाराने आमच्‍या समस्‍या सोडवायला पाहिजे. मतदारसंघात फिरून आम्‍ही युवकांनी गावोगावी जावून समस्‍या जाणून घेतल्‍या तेव्‍हा समाजाचे प्रश्‍न जैसेथेच असल्‍याचे आम्‍हाला दिसून आल्‍याचे युवकांनी सांगितले.

मातंग समाजाचे असंख्‍य नागरिक ऊस तोडीला जातात, घनसावंगी मतदारसंघात बहुतांश गावांमध्‍ये मातंग समाजासाठी सभामंडप नाही, स्‍मशानभुमी नाही, दलित वस्‍तीमध्‍ये रस्‍ता नाही, नाल्‍या नाहीत, पाणी नाही, रोजगाराची समस्‍या आहे, शिक्षणाची समस्‍या आहे, शासनाच्‍या योजना समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्‍यामुळे समाजात नाराजीची भावना आहे.

त्‍यामुळे यावेळेस जो उमेदवार पोकळ आश्‍वासन न देता आमच्‍या समाजाची दखल घेईल व आमचे प्रश्‍न सोडवेल त्‍याच्‍या पाठीशी समाज उभा राहील अशी भावना सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, रविराज पाखरे, दिपक पिसुळे, लक्ष्मण लोंढे, सुखदेव कासार, लखन हिवाळे, शिवाजी शिंदे, आकाश कारके, ज्ञानेश जाधव, विशाल लालझरे, सुनिल कासार, संतोष पिसुळे, अनिल हिवाळे इत्‍यादी युवकांनी केली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!