एल्गार न्यूज :-
नगर व नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचे आदेश असल्यामुळे आता पाणी जायकवाडी धरणासासाठी सोडण्यात आले आहे, त्यामुळे मराठवाड्याला बऱ्याच अंशी दिलासा मिळणार आहे.
मराठवाड्याला पाणी देवू नये यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील काही मंडळींनी विरोध दर्शवत न्यायालयात धाव घेतली होती, परंतू न्यायालयाने सदरील आदेशास स्थगिती देण्यास नकार दिला होता, त्यामुळे जायकवाडी धरणात अर्थात दुष्काळी मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
पाण्यासाठी रास्ता रोको :-
समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार जायकवाडी धरणाच्या हक्काचे 8.608 टीएमसी पाणी हे तात्काळ सोडण्यात यावे या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी समृध्दी कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते व नागरिकांनी धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते.
कार्यकर्त्यांचा जल्लोष !
आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे कुंभार पिंपळगांव येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला, कार्यकर्त्यांनी सांगितल्यानुसार समृध्दी कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका व सततच्या पाठपुराव्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये पाणी सोडण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सतिष घाटगे यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी कंटुले, रणजित उढाण, विष्णू शिंदे, सौ.द्वारका मेहेत्रे, भगवान शिंदे, विशाल बुरसे, निलेश कंटफले, हनुमंत आर्दड, अमोल तौर, प्रल्हाद कंटुले, लक्ष्मण गायकवाड, रोहीत पवार, अशोक जहाट, राजु साळवे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.