Your Alt Text

सावधान ! निवडणूका येत आहेत ! डोकं शांत ठेवा ! | Upcoming Election News

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-

Upcoming Election News : येत्‍या काही महिन्‍यात निवडणूका लागणार आहेत. निवडणूका ह्या लोकशाही मध्‍ये महत्‍वपूर्ण आहेत मात्र अनेकदा असे दिसून येते की, निवडणूका आल्‍यावर मुळ मुद्यांना बगल देवून इतर मुद्यांकडे लक्ष वळवले जाते, एकमेकांविषयी द्वेष पसरवला जातो, भांडणे लावली जातात आणि स्‍वत:चा हेतू साध्‍य करून घेतला जातो.

वर्षानुवर्षे सर्वसामान्‍य नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न सुटलेले नाहीत, आजही सर्वसामान्‍य नागरिकांना छोट्या छोट्या गोष्‍टींसाठी झगडावे लागते, तारेवरची कसरत करावी लागते, परंतू प्रश्‍न सुटत नाहीत. का तर ज्‍यांची जबाबदारी आहे ते लक्ष देत नाहीत. जेव्‍हा लोक प्रश्‍न विचारायला लागतात तेव्‍हा ते मुळ प्रश्‍नाला बगल देवून इतर मुद्याकडे लक्ष वळवतात.

तुम्‍हाला जर हे खोटे वाटत असेल तर येत्‍या काही महिन्‍यातच निवडणूका होणार आहेत. पुढील काही महिन्‍यात सर्वसामान्‍य जनतेशी संबंधित मुलभूत प्रश्‍न सोडून इतर मुद्दे समोर आले तर आश्‍चर्य वाटायला नको. कारण वर्षानुवर्षे हेच होत आहे आणि आपणही या चक्रव्‍युहात अडकत आलो आहोत.

सर्वसामान्‍य नागरिकांचे प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित राहत आहेत. जो पर्यंत आपण मुलभुत प्रश्‍नांवर आवाज उठवत नाहीत तो पर्यंत असंच चालत राहणार. विशेष करून निवडणूकांमध्‍ये तर मुलभुत प्रश्‍नांवर कमी आणि इतर प्रश्‍नांवर जास्‍त लक्ष वळवले जाते, त्‍यामुळे हे प्रश्‍न तसेच राहतात.

आपले वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्‍न आणि मागण्‍या यांचा सातत्‍याने पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. कारण कदाचित निवडणूका संपल्‍यावर प्रलंबित प्रश्‍न किंवा समस्‍यांकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कोर्ट कचेऱ्यांच्‍या चकरा :-

अनेक मंडळी सर्वसामान्‍यांची माथी भडकवून कायदा हातात घेण्‍यासाठी पृवत्‍त करत असतात, अशा लोकांपासून सावधान असणे गरजेचे आहे. कारण त्‍यांच्‍या कटकारस्‍थानात जे सहभागी होवून कायदा हातात घेतात त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल होवून त्‍यांना वर्षानुवर्षे कोर्टाच्‍या चकरा माराव्‍या लागतात, मोठ्या प्रमाणावर स्‍वत:चा पैसा खर्च होतो, आणि एकदा त्‍या व्‍यक्‍तीची गरज संपल्‍यास संबंधित मंडळी दूसरा माणूस शोधत असतात.

राजकारणासाठी वापर :-

अनेकदा दिसून येते की, निवडणूका आल्‍याकी काही मंडळी सर्वसामान्‍य लोकांचा राजकीय हेतूने वापर करून घेतात, विशेष करून एकमेकांविषयी द्वेष पसरवणे, आपापसात भांडणे लावणे आणि मुळ मुद्दे सोडून इतर मुद्यांकडे लक्ष वळवले जाते. निवडणूका संपल्‍या की, पुन्‍हा त्‍या व्‍यक्‍तीकडे लक्ष सुध्‍दा दिले जात नाही. त्‍यामुळे आपला कोणी वापर तर करून घेत नाही ना याचा विचार करणे आवश्‍यक आहे.

परवेज पठाण,
संपादक, एल्‍गार न्‍यूज

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!