विशेष प्रतिनिधी :-
जेव्हा चुकीच्या लोकांना असुरक्षित वाटू लागते, जेव्हा त्यांना आपला कार्यक्रम लागतो की काय अशी भिती वाटू लागते आणि जेव्हा ते इतर पर्याय करूनही यशस्वी होत नाहीत तेव्हा ते समोरच्या व्यक्तीवर विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात.
परवेज पठाण यांच्या विषयी…
एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण हे पत्रकारिता पदवीधर (BMCJ) तर आहेच शिवाय मागील 14 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत, तसेच संगणक क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. शिवाय वेब डेव्हलपमेंट शिकून “एल्गार न्यूज” हे पोर्टल त्यांनी स्वत:च डेव्हलप केले आहे.
एल्गार न्यूजची सुरूवात…
मध्यंतरी परवेज पठाण हे खूप आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर मित्र त्यांना विनोदाने सांगू लागले की, भाई तुम्ही आतापर्यंत घर जाळून कोळशेच केले आहे, नव्हे तर कोळशांची राख सुध्दा झाली आहे, त्यामुळे स्वत:च्या व्यवसायाकडे लक्ष द्या, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून परवेज पठाण यांनी व्यवसायाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली.
त्यामुळे मागील काही दिवस पत्रकारिता क्षेत्रात ते विशेष काही सक्रीय नव्हते, परंतू परवेज पठाण यांनी विविध सामाजिक व इतर सर्वच मुद्यांवर याआधी प्रमाणेच नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक लिखाण सुरूच ठेवावे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वारंवार आग्रह केला, शिवाय डोळ्या देखत घडणाऱ्या चुकीच्या घटना अस्वस्थ करू लागल्या होत्या, सर्वांची विनंती आणि आग्रह लक्षात घेवून स्वत:चा मल्टीसर्व्हिसचा व्यवसाय सुरूच ठेवून “एल्गार न्यूज” हे ऑनलाईन न्यूज पोर्टल 2 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू करण्यात आले.
दबाव आणण्याचा प्रयत्न !
एल्गार न्यूज सुरू होवून अवघा एक महिनाच उलटला आहे, शिवाय खऱ्या अर्थाने 15 ते 20 दिवसांपासूनच लिखाणाला सुरूवात केली आहे, मागील काही दिवसात कुंभार पिंपळगांवसह सर्कल मधील सातत्याने विविध प्रकारच्या अवैध धंद्याच्या अधून मधून स्वतंत्र बातम्या घेण्यात आल्या, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या बँकांमधील दलालांच्या बातम्या घेण्यात आल्या, शिवाय इतर जे जे चुकीचे घडत आहे त्याच्या बातम्या घेण्यात आल्या.
मात्र या रोखठोक आणि निर्भीड लिखाणामुळे अनेकांना मिर्च्या झोंबू लागल्या आहेत, अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत, अनेकांमध्ये अस्वस्थता पहायला मिळाली, अनेकांना वाटू लागले आपले नुकसान होवू शकते तेव्हा त्या लोकांनी थेट काहीही न बोलता इतरांच्या माध्यमातून संपादक परवेज पठाण यांना समजावण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला यश मिळत नसल्याचे पाहून काही देणेघेणे होवू शकते का याची दुसऱ्याच्या माध्यमातून चाचपणी करण्यात आली.
त्याच्यातही या लोकांना यश मिळाले नाही तेव्हा भिती दाखवण्याचा प्रयत्न केला, हे सगळे दुसऱ्याच्या माध्यमातूनच म्हणजेच अप्रत्यक्षपणे करण्यात आले, मात्र सर्व काही प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर आता या लोकांनी संपादक परवेज पठाण यांचे नातेवाईक, जवळचे पाहुणे, मित्र यांच्या माध्यमातून दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. एक स्थानिक राजकीय व्यक्तीही या प्रकरणात डोकं लावत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
दबाव कसा तर यापुढे आमच्या विरूध्द बातम्या घेवू नये म्हणून केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. थेट बोलायची तर हिम्मतच नाही, कधी बँकांचे दलाल तर कधी एखादा पोलीस कर्मचारी तर कधी अवैध धंदे करणारे तर कधी इतर लोक हे नातेवाईक, पाहुणे, मित्र यांना सांगून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
थेट बोलायची हिम्मतच नाही !
याबाबत संपादक परवेज पठाण यांनी सांगितले की, मागील 14 वर्षांचा पत्रकारितेचा इतिहास पाहील्यास माझ्यावर एकही डाग लागलेला नाही. कितीही संकटे आली, आर्थिक अडचणी आल्या परंतू पत्रकारितेला धंदा बनवले नाही. कायमच नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक पत्रकारिता केली.
एवढ्या वर्षात बातमी घेवू नका म्हणून प्रत्यक्ष थेट बोलण्याची कोणाचीही हिम्मत झाली नाही जी आजही कायम आहे. मात्र काही लोक अप्रत्यक्षपणे नातेवाईक, पाहुणे, मित्र यांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याला मी घाबरणार नाही आणि थांबणारही नाही. कितीही दबाव आणू द्या लेखणी खाली ठेवणार नाही, कदाचित त्या लोकांना माहित नसावे की, जख्मी वाघ अधिक धोकादायक असतो.
स्थानिक पत्रकारांसह महाराष्ट्रातील पत्रकार बांधव कायमच पाठीशी आहेत यात शंका नाही, त्याबद्दल समस्त पत्रकार बांधवांचे नेहमीप्रमाणे मनापासून धन्यवाद… पत्रकार बांधवांनी काळजी करू नये, मी समर्थ आहे आणि या प्रवृत्तीशी लढण्यास सक्षम आहे, कोणी कितीही साम, दाम, दंड, कशाही माध्यमातून डोकं लावल्यास काहीही करू शकणार नाहीत. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अन्याया विरूध्द एल्गार सुरूच राहील.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.