आपण ज्या व्यक्तीबद्दल माहिती घेत आहोत त्या व्यक्तीचे नाव आहे विजय संकेश्वर. ज्यांच्याकडे 1 ट्रक घेण्यासाठी सुध्दा पैसे नव्हते परंतू आज ते 5000 गाड्यांचे मालक आहेत. आज ते VRL लॉजिस्टीकचे मालक आहेत.
मिडीया रिपोर्टनुसार विजय संकेश्वर यांचे कुटुंब पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाशी संबंधित होते, कुटुंबातील सदस्यांनीही त्यांना आपलाच पारंपारिक व्यवसाय करावा आणि दुसऱ्या व्यवसायात जावू नये असे सांगितले होते, परंतू विजय संकेश्वर यांचे मन त्यात रमत नव्हते, त्यांना नवीन काहीतरी करायचे होते.
त्यांनी सुरूवातीला उधार पैसे घेवून 1 ट्रक घेतला, नंतर याच ट्रकच्या माध्यमातून व्यवसाय वाढवला, एक एक करत त्यांनी अनेक वाहने घेतली, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला वाढता प्रतिसाद पाहता त्यांनी ट्रक वाढवण्यावर भर दिला, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय एवढा वाढत गेला की, त्यांनी याच्याशी संबंधित एक कंपनी सुरू केली.
आज त्यांच्याकडे 5000 व्यावसायिक वाहने आहेत, त्यांची उलाढाल कोट्यावधीची आहे, अर्थातच ते हजारो कोटींचे मालक आहेत. एवढे वाहन त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे. त्यांच्या वर आधारित एक चित्रपट सुध्दा निघाला आहे, त्याचा प्रवास नक्कीच अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.