एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणपासून त्यांना वंचित रहावे लागते. अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून शासनाकडून अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक विभागाच्या वतीने “परदेशी शिष्यवृत्ती योजना” सुरू करण्यात आली आहे.
दि.२३/११/२०२३ चा शासन निर्णय व वेळोवेळी सुधारणा केलेल्या संदर्भाधीन शुद्धीपत्रकानुसार “परदेशी शिष्यवृत्ती योजना” सन २०२४-२५ पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी २०० क्यूएस वर्ल्ड रॅंकिंगच्या (QSWR) आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा एकूण ७५ विद्यार्थ्यांची योजने अंतर्गत निवड करण्यात येवून त्यांना परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येत असल्याबाबत अल्पसंख्याक विभागाच्या ७ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयात (GR) मध्ये नमूद आहे.
त्यानुसार सन २०२४-२५ या वर्षाकरीता परदेश शिष्यवृत्ती योजने अंतर्गत दि.४/१०/२०२४ नुसार २४ पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना पात्र विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेश शिष्यवृत्ती योजने अंतर्गत दि.२३/११/२०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार व सदर शासन निर्णय तसेच वेळोवेळी सुधारणा केलेल्या संदर्भाधीन शुद्धीपत्रकातील अटी व शर्तीनुसार निवड केलेल्या २३ पदव्युत्तर पदवी चे विद्यार्थी व ०१ डॉक्टरेट अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अशा एकूण २४ विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. खाली विद्यार्थ्याचे नाव, कोर्सचे नाव आणि कोणत्या देशात शिक्षणाकरीता जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे त्याची माहिती.
कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झाली ?
- 1] रिया संजय सुरवसे
- PG – MSE in Finance and Investment – United Kingdom
- 2] अभिषेक ज्ञानेश्वर शेंडे
- PG – Master of Professinal Engineering (Accelerated / Chemical and Biomolecular) – Australia
- 3] सय्यद अन्सार अली सय्यद सोफी अली
- PG – MSE in Mechanical Engineer – United States
- 4] अनिकेत बाळासाहेब साबने
- PG – Master of Biotechnology – Australia
- 5] संकेत रविंद्र बिडकर
- PG – Master of Professinal Engineering civil Engineering (Transport) – Australia
- 6] अश्विनी शलीकराम मेश्राम
- PG – MS in Technology Management – United States
- 7] अनुष्का सुनील दरूरे
- PG – Master in Engineering Management – United States
- 8] प्रबुद्धराज पुरूषोत्तम गायकवाड
- PG – Master of Professional Engineering – Civil Engineering (structure) – Australia
- 9] अजिंक्य प्रकाश मोहिले
- PG – Master of Urbanism (Urban and Regional Planning) –United Kingdom
- 10] प्रतिक्षा धर्मपाल मेश्राम
- PG – Master of Science – Physiotherapy (Generic) – United Kingdom
- 11] श्रूती प्रकाश करमरकर
- PG – Masters in Computer Engineering – United States
- 12] दिक्षीता सूर्यकांत बनसोडे
- PG – Clinical Neuroscience – United Kingdom
- 13] नेहा तुकाराम कांबळे
- PG – MSc in Engineering Management – United Kingdom
- 14] साहिल भारत मेश्राम
- PG – Master of Computer Science – Australia
- 15] रूचिका राजेश कांबळे
- PG – Msc. Business Analytics – United Kingdom
- 16] गौरव भास्कर सपकाळ
- PG – MSc Global Strategy and Sustainability – United Kingdom
- 17] युगल महावीर खांतेर
- P.hd. Master of Science in Computer Science – United States
- 18] रोझा राजकुमार बाविस्कर
- PG – Master in Advanced Clinical Fellowship in Oral Surgery – United States
- 19] रीबा अस्लम शेख
- PG – MSc in Management – United Kingdom
- 20] कुलदीप कचरू आंबेकर
- PG – Education Policy and International development (Msc) – United Kingdom
- 21] यशकुमार विनोदराव डांगे
- PG – Master’s of Business – Australia
- 22] शेख मुहम्मद जैद मुस्ताक
- PG – MSc Management – Australia
- 23] सयम रविंद्र जैन
- PG – Master of Science in Finance – Australia
- 24] पल्लवी नितीन कोचर
- PG – Master of Science in Finance – United States
या २४ विद्यार्थ्यांची विविध देशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत निवड करण्यात आली आहे. तसेच खालील ३ विद्यार्थ्यांची निवड ही समितीने केलेल्या शिफारशीस अधिन राहून करण्यात येईल, तोपर्यंत सदर खालील ३ विद्यार्थ्यांना प्रतिक्षा यादीत (Waiting List) ठेवण्यात येत आहे.
- 1] सानिया संजय सुरवसे
- PG – Master of Science in Business Analytics – United Kingdom
- 2] प्रिती प्रकाश करमरकर
- PG – Masters in Management of Technology – United States
- 3] वृतवीक संजय धिवरे
- PG – MSc Business Analytics