एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील बसस्थानकांसाठी २३ जानेवारी २०२५ पासून स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ची सुरुवात केली आहे. राज्यातील बसस्थानक मधील प्रवाशांच्या चढ उतार च्या आधारे अ., ब., क., अशी वर्गवारी करण्यात आली. या मध्ये वर्गवारी प्रमाणे क्रमांक देवून पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
या कार्यासाठी विभाग पातळीवर संबंधित अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही मुल्यांकन समिती असून वर्षभरात विविध विभागांची मिळून चार मुल्यांकन समिती बसस्थानकात प्रत्यक्ष भेट देवून स्वच्छ व सुंदर बसस्थानक साठी परिक्षण करणार आहे. या मध्ये प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच बसस्थानक स्वच्छ व सुंदर साठी फुल झाडांच्या कुंड्या, बगीचा, सेल्फी पॉईंट तयार करणे, प्रवाशांच्या माहिती साठी एसटी बस चे वेळापत्रक फलक बसवणे, बसस्थानक परिसरात स्वच्छता राखणे, स्वच्छतेसाठी कचराकुंडी बसवणे, सुलभ शौचालय स्वच्छ ठेवणे, एसटी ची विविध योजनांची माहिती देणे या सह अनेक कामे यामध्ये समाविष्ट आहेत.
या कार्यासाठी राज्य परिवहन महामंडळ तसेच विविध सामाजिक संघटना, पत्रकार यांच्या कडून या कार्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्याचा संबंधित मुल्यांकन समिती वरिष्ठांना या संबंधी अहवाल पाठविणार आहे. त्या आधारे वर्गवारी नुसार स्वच्छ, सुंदर बसस्थानक चा क्रमांक काढून पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यासाठी नुकतीच कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी, जि.जालना) बसस्थानक येथे द्वितीय मुल्यांकन समिती बीड विभाग ने भेट देवून समाधान व्यक्त केले तर या कार्यासाठी आणखी काही उपाय योजना ची आवश्यकता असून ते सोडविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ यांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी द्वितीय मुल्यांकन समिती बीड विभागचे विभाग नियंत्रक अनुजा दुसाने, विभागीय वाहतूक अधिक्षक शिवराज कराड, आस्थापना पर्यवेक्षक कुनाल गोदाम, अंबड आगार प्रमुख संदिप साठे, अंबड बसस्थानक प्रमुख चंद्रजित गिलचे, कुंभार पिंपळगाव बसस्थानक वाहतूक नियंत्रक राजु खरात, तसेच ज्येष्ठ पत्रकार इब्राहिमभाई पठाण, भागवत राऊत, प्रकाश बिलोरे, महारुद्र आप्पा टेकाळे यांच्या सह अनेक प्रवाशी उपस्थित होते. यावेळी प्रवाशांच्या मागणीनुसार बीड विभागातील माजलगाव आगाराची माजलगाव – आष्टी एसटी बस फेरी कुंभार पिंपळगाव पर्यंत वाढविण्याची मागणी केली असता संबंधित अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.