Your Alt Text

आमचं औषध घ्‍या आणि लवकर आजार बरा करा म्‍हणणाऱ्या फसव्‍या जाहिरातींना सुप्रीम कोर्टाचा दणका ! | Supreme Court warns against misleading ad

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
आजकाल विविध माध्‍यातून आजार बरा करण्‍याच्‍या जाहिराती प्रकाशित होतांना दिसून येतात, अनेकजण आपली उत्‍पादने किंवा औषधी विक्री करण्‍यासाठी सर्वसामान्‍य जनतेची दिशाभूल करून खोटे दावे करत असतात, मात्र अशा कंपन्‍यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेदा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, त्‍यामध्‍ये पतंजलीच्‍या जाहिराती ह्या दिशाभूल करणाऱ्या तसेच अॅलोपॅथीचा अपमान करणाऱ्या असून काही आजार बरे करण्‍याचे खोटे दावे करत असल्‍याचा आरोप याचिकेत करण्‍यात आला होता.

सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावनी पार पडली, त्‍यात सुप्रीम कोर्टाने नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून पतंजली आयुर्वेदला कडक शब्‍दात फटकारंल आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरू राहील्‍यास प्रत्‍येक उत्‍पादनावर 1 कोटींचा दंड आकारला जाईल असा इशारा दिला आहे.

आदेश इतरांनाही लागू !

ज्‍या कंपन्‍या विविध आजारासंबंधी खोटे आणि भ्रामक किंवा दिशाभूल करणारे दावे करतील त्‍यांनाही कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. कोणत्‍याही प्रकारच्‍या खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती त्‍वरित थांबवणे आवश्‍यक असून जर आदेशाचे उल्‍लंघन झाल्‍यास त्‍याची गंभीर दखल मा.न्‍यायालय घेणार आहे.

सर्रास दिशाभूल !

10 दिवसात 10 किलो वजन कमी करा, महिनाभरात उंची वाढवा, जुनाट आजार झटक्‍यात बरा करा, अमुक आजार एकमेव उपचार किंवा अशा प्रकारच्‍या भ्रामक, खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या विविध कंपन्‍यांच्‍या जाहिरातींना या आदेशामुळे मोठी चाप बसणार आहे.

उपचार कोणतेही असो, अॅलोपॅथी असो किंवा आयुर्वेदिक असो, त्‍याचा खरोखर फायदा नागरिकांना होणे अपेक्षित आहे, मात्र काही कंपन्‍या आपले उत्‍पादन किंवा औषध विकण्‍यासाठी जाहिरातींच्‍या माध्‍यमातून खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे करत असतात, या प्रकाराला आळा घालण्‍यासाठी न्‍यायालयाचे आदेश महत्‍वपूर्ण ठरणार आहे.

पुढील सुनावणी

सर्वोच्‍च न्‍यायालयाने भारताचे अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांना सांगितले आहे की, केंद्र सरकारने या समस्‍येचा सामना करण्‍यासाठी व्‍यवहार्य तोडगा काढावा, न्‍यायालयाने योग्‍य ती सल्‍लामसलत करून न्‍यायालयात येण्‍यास सांगितले आहे, या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!