एल्गार न्यूज :-
Sugarcane FRP Price Increase : शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून मिळावा म्हणून वर्षानुवर्षे मागणी केली जाते, परंतू काही अपवाद सोडल्यास ऊसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याचे वारंवार पहायला मिळते.
कारखान्यांना ऊसाच्या माध्यमातून चांगला नफा होवूनही कारखाने योग्य तो दर देत नसल्याचा आरोप अनेकदा होतांना दिसून येतो. कारखान्याला साखरे सोबतच ऊसाची मळी, इथेनॉल व इतर अनेक गोष्टीतून नफा होत असल्याचे सांगण्यात येते, परंतू साखर कारखाने शेतकऱ्यांना अपेक्षित दर देत नसल्याचा आरोप केला जातो.
परंतू आता एका कारखान्याने तब्बल 3773 रूपये दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. फक्त एकच कारखाना नव्हे तर इतर अनेक कारखान्यांनी या दराच्या आसपास दर जाहीर केले आहेत, त्यामुळे यावर्षी ऊसाला चांगला दर मिळेल असे सांगण्यात येत आहे.
कुठे मिळाला विक्रमी दर ?
कनार्टक मधील रेणुका साखर कारखान्याने सर्वाधिक 3773 रूपये जाहीर केला आहे, त्यापाठोपाठ व्यंकटेश्वर कारखान्याने 3693 रूपये दर जाहीर केल्याचे समोर आले आहे.
एवढंच नव्हे तर या राज्यातील तब्बल 27 कारखान्यांनी 3 हजारापेक्षा जास्तीचा दर जाहीर केला आहे. कर्नाटक मध्ये ऊसाचे क्षेत्र तुलनेने महाराष्ट्र पेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येते, त्यातच यावर्षी ऊसाचे उत्पादनही कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Sugarcane FRP Price Increase
देशात इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे असंख्य कारखाने इथेनॉल निर्मिती करत आहेत. त्यामुळे कारखान्यालाही फायदा होत आहे. अनेक कारखाने त्यांना होणारा फायदा लक्षात घेता शेतकऱ्यांनाही वाढीव दर देत असतात.
महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना वाढीव दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. केंद्र शासनाने ऊस दराबाबत नुकतंच आदेश जारी केले असून त्यानुसार महाराष्ट्रातील कारखान्यांनाही ऊसाला चांगला दर द्यावा लागणार आहे. मात्र ते किती दर देतात ते येत्या काळातच कळणार आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.