एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसांपासून एसटी (बस) सेवा बंद आहे त्यामुळे परीक्षेला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी तिर्थपूरी येथे बस जाळल्यामुळे अंबड आगाराच्या वतीने एसटी (बस) सेवा बंद करण्यात आली होती, सदरील घटनेमुळे तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणी बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे खूप मोठे हाल होत होते.
प्रवाशांची लूट !
एसटी बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणारे प्रवाशांकडून दुप्पट पैसे वसूल करत होते. बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना दुप्पट पैसे देवून प्रवास करावा लागत होता, शिवाय महिलांना अर्धे तिकीट व वयोवृध्द नागरिकांना मोफत प्रवासही करता येत नव्हता. मात्र आता सर्वांची अडचण दूर होणार आहे.
एसटी सेवा सुरू होणार !
विद्यार्थ्यांसह प्रवाशांना होत असलेल्या अडचणी बाबत जालनाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल तसेच अंबडचे आगारप्रमुख श्री.कोळपे यांना “एल्गार न्यूज” द्वारा विचारणा केली असता दोघांनीही एसटी बस सेवा उद्या सोमवार दि.4 पासून सुरू करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे सोमवार पासून विद्यार्थ्यांसह समस्त प्रवाशांची अडचण दूर होणार आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.