Your Alt Text

5 दिवसात अवैध धंदे बंद करण्‍याचे जालना पोलीस अधिक्षकांचे आदेश ! परंतू स्‍था. काही पोलीसांचे 2 नंबरवाल्‍यांशी असलेल्‍या अर्थपूर्ण संबंधाचं काय ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत, कधी उघड तर कधी छुप्‍या पध्‍दतीने अवैध धंदे सुरू असतात. नावाला एखादी कारवाई सुध्‍दा केली जाते, परंतू काही दिवसानंतर परिस्थिती जैसेथेच होते.

सध्‍या असलेले जालना जिल्‍ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे हे आल्‍यापासून अॅक्‍शन मोड मध्‍ये दिसत आहेत, आता त्‍यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍ह्यातील पोलीस ठाण्‍यांना आदेश दिले आहेत, जे की स्‍वागतार्ह आहे.

सदरील आदेशानुसार 5 दिवसात ठाण्‍याअंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे ठाणेप्रमुखांनी बंद करावेत, या कालावधीत अवैध धंदे बंद नाही झाले तर पथक पाठवून कारवाई करण्‍यात येणार आहे, त्‍यात दोषी आढळल्‍यास ठाणे प्रमुखांवर कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचा इशारा पोलीस अधिक्षकांनी दिला आहे. अनेक ठिकाणी कारवाई सुध्‍दा होतांना दिसत आहे.

पुढे पाठ मागे सपाट !

पोलीस अधिक्षकांनी दिलेल्‍या इशाऱ्यानंतर अर्थातच स्‍वत:वर कारवाई होण्‍याच्‍या दृष्‍टीने ठाण्‍या अंतर्गत अवैध धंदे करणाऱ्या काही लोकांवर कारवाई होईल असे सध्‍या तरी दिसत आहे. मात्र काही दिवसानंतर हे अवैध धंदे पुन्‍हा सुरू होणार नाही याची खात्री सध्‍या देणे अवघड असल्‍याचे मत नागरिकांनी व्‍यक्‍त केले आहे.

अर्थपूर्ण संबंध !

घनसावंगी पोलीस ठाण्‍या अंतर्गत असलेल्‍या अनेक गावांमध्‍ये अवैध धंदे सुरू आहेत, कुंभार पिंपळगांव आणि परिसरातही अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. सध्‍या आदेश असल्‍यामुळे कदाचित काही अंशी त्‍यात फरक पडेल परंतू स्‍थानिक (काही) पोलीसांचे अवैध धंदे करणाऱ्यांशी असलेले अर्थपूर्ण संबंधांमुळे काही दिवसांनी पुन्‍हा परिस्थिती जैसेथे होईल असे नागरिक सांगत आहेत.

अवैध धंद्यांना कोणाचा आशिर्वाद !

कुंभार पिंपळगांव आणि परिसरात मटका, गांजा सुरू असून पत्‍याचे तर क्‍लब सुरू आहेत. तसेच अवैध दारू विक्री सुरू असून परिसरातील अनेक गावांमध्‍ये अवैध दारू पार्सलही केली जात आहे. पहाटे आणि संध्‍याकाळच्‍या वेळी अवैध दारू पार्सल केली जात असल्‍याचे नागरिक सांगत आहेत. तसेच वाळूची अवैध वाहतुकही रात्रीच्‍या वेळी सुरू असते. अर्थपूर्ण संबंधांमुळे अशा प्रकारचे अनेक अवैध धंदे कोणाच्‍या आशिर्वादाने सुरू आहेत याचाही तपास वरिष्‍ठांनी करणे आवश्‍यक आहे.

पोलीसांविषयी आदरच !

इमाने इतबारे व कर्तव्‍यदक्षपणे काम करणाऱ्या पोलीसांविषयी समाजामध्‍ये आदरच आहे, परंतू काही पोलीस अधिकारी / कर्मचाऱ्यांमुळे इतर पोलीसही बदनाम होत असल्‍याचे चित्र आहे. आता पोलीस अधिक्षकांनी दिलेल्‍या इशाऱ्यानंतर किती फरक पडतो आणि अर्थपूर्ण संबंध किती संपुष्‍टात येतात हे येणारा काळच सांगेल असे म्‍हणायला हरकत नाही.

अपुरे पोलीस कर्मचारी !

कुंभार पिंपळगांव चौकीला असलेल्‍या अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे स्‍थानिक यंत्रणा कोलमडल्‍याचे चित्र आहे. 3 ते 4 कर्मचाऱ्यांच्‍या जीवावर सर्कल मधील अनेक गावांवर नियंत्रण ठेवणे शक्‍य आहे का ? कुंभार पिंपळगावाची लोकसंख्‍याच 15 ते 20 हजार आहे, शिवाय या चौकी अंतर्गत परिसरातील अनेक गावे येतात, मग एवढ्या गावातील कायदा व सुव्‍यवस्‍था आणि अवैध धंदे नियंत्रणात ठेवणे सध्‍या असलेल्‍या मर्यादित कर्मचाऱ्यांना शक्‍य आहे ? का याचाही विचार वरिष्‍ठांनी करणे आवश्‍यक आहे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पाहू शकता…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

fjsdkljsfklsjd 1
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!