Your Alt Text

या तारखेपासून सिमकार्ड खरेदी विक्रीचे नियम कठोर ! 10 लाखांचा दंड, 3 वर्षांची जेल ! | SIM card sale rules will be strict

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
आजकाल बनावट सिमकार्ड च्‍या आधारे फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत, देशातील सर्वसामान्‍य नागरिकांना या फसवणूकीच्‍या प्रकारामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, बनावट सिमकार्ड वापरल्‍याने आरोपीला पकडणे अनेकदा अवघड जाते.

मात्र आता केंद्र सरकारने नवीन नियम येत्‍या 1 डिसेंबर 2023 पासून लागू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. सदरील निर्णयानुसार सिमकार्ड विक्री करणाऱ्यांना नवीन नियमानुसारच सिमकार्ड विक्री करता येणार आहे, नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास मोठ्या दंडासह जेलची हवा सुध्‍दा खावी लागणार आहे.

केंद्र सरकारने बनावट सिमकार्डच्‍या आधारे होणारे गुन्‍हे, फसवणुकीचे प्रकार रोखण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमां अंतर्गत सिमकार्डची विक्री करणाऱ्यांना ग्राहकांची योग्‍य प्रकारे केवायसी करावी लागणार आहे. शिवाय एकापेक्षा अधिक सिमकार्ड खरेदी करण्‍यावर तसेच विक्री करण्‍यावर सुध्‍दा बंधने घालण्‍यात आली आहेत.

अर्थातच एखादा व्‍यक्‍ती एकापेक्षा जास्‍त सिमकार्ड खरेदी करू शकणार नाही, किंवा विक्री करणाऱ्यालाही एकापेक्षा अधिक सिमकार्ड एखाद्या व्‍यक्‍तीला विक्री करता येणार नाहीत. शिवाय एका ओळखपत्रावर मर्यादितच सिमकार्ड खरेदी केली जावू शकणार आहेत.

…तर 3 वर्षांचा कारावास !

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्‍णव यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सायबर गुन्‍हेगारी आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्‍याच्‍या उद्देशाने सरकारने सिमकार्ड बाबत नवीन नियम जारी केले आहेत. या नियमा अंतर्गत सर्व सिमकार्ड विक्रेता म्‍हणजे POS यांना 30 नोव्‍हेंबर पर्यंत रजिस्‍टर करणे अनिवार्य करण्‍यात आले आहे.

या नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास 10 लाखांचा दंड ठोठावला जावू शकतो, शिवाय जेलमध्‍ये सुध्‍दा जावे लागू शकते. काही विक्रेता योग्‍य पडताळणी आणि पाहणी न करताच सिमकार्डची विक्री करत असल्‍याचे याआधी रिपोर्टस् मधून समोर आले आहे. सध्‍याच्‍या घडीला देशात 10 लाख सिमकार्ड विक्रेते आहेत.

सिमकार्डच्‍या आधारे आरोपी फसवणुक करण्‍याच्‍या अनेक घटना वारंवार घडत आहेत, जर कोणी बनावट सिमकार्डची विक्री करतांना आढळलं तर त्‍याला 3 वर्षांची जेल होणार आहे. यासह त्‍याचा परवानाही काळ्या यादीत टाकला जाणार आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!