एल्गार न्यूज विशेष :-
अनेक वर्षांपासून कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे जनतेच्या सेवेत सुरू असलेल्या सवेरा डिजिटल (मल्टिसर्व्हिसेस) चे स्थलांतरासह शुभारंभ आणि अल्पावधीतच लाखो वाचकांचा टप्पा पार करणाऱ्या एलगार न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ संपादक परवेज पठाण यांच्या मातोश्री फैमीदा इब्राहीम पठाण यांच्या हस्ते दि.१ रोजी करण्यात आला.
एल्गार न्यूजची सुरूवात !
घनसावंगी तालक्यासह जालना जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध विषयांवर अर्थातच जनहिताच्या प्रश्नांवर नि:पक्ष, निर्भीड व रोखठोकपणे लिखाण करता यावे, या प्रामाणिक उद्देशाने अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या एल्गार न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलला वर्षभरातच लाखो वाचकांनी भेट देवून बातम्या वाचल्या आहेत आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संपादकांनी १६ वर्षांपूर्वी पत्रकारितेची सुरूवात केल्यानंतर तसेच पत्रकारितेची पदवी (Bachelor of Mass Communication & Journalism) घेतल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात सक्रीयपणे कार्यरत राहून समाजहिताच्या विविध विषयांवर लिखाण केले, मात्र लिखाणात येणाऱ्या काही मर्यादा लक्षात घेवून वर्षभरापूर्वी स्वत:चे ऑनलाईन न्यूज पोर्टल (एल्गार न्यूज) सुरू करून सडेतोडपणे लिखाण करण्यास सुरूवात केली आणि अवघ्या वर्षभरातच हे न्यूज पोर्टल लाखो वाचकांच्या पसंतीस पात्र ठरले.
डिजिटल मीडियाचे वाढते महत्व आणि कमी वेळेत सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्याच्या दृष्टीने एल्गार न्यूज पुढील वाटचाल करीत आहे. आतापर्यंत एल्गार न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी निगडीत अनेक प्रश्न आणि समस्या मार्गी लागल्या असून अनेक प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा सुरू आहे. एल्गार न्यूज लवकरच व्हिडीओ फॉरमेट मध्ये सुध्दा उपलब्ध होणार आहे, याकरीता अर्थातच चांगली क्वालिटी, चांगले कंटेंट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृ्ष्टीने पहिले आणि महत्वाचे पाऊल म्हणून संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

मातोश्रींच्या हस्ते शुभारंभ !
सवेरा डिजिटल आणि एल्गार न्यूज च्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम संपादक परवेज पठाण यांच्या मातोश्री (आई) सौ.फैमिदा इब्राहीम पठाण यांच्या हस्ते १ जानेवारी २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कुंभार पिंपळगांव येथे स्वत:च्या सवेरा कॉम्प्लेक्स (बॅंक ऑफ महाराष्ट्र समोर) येथे सदरील संपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मान्यवरांची उपस्थिती !
सवेरा डिजिटल व एल्गार न्यूजच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन अथवा शुभारंभ निमित्त सर्वश्री सन्माननीय कृ.उ.बाजार समितीचे संचालक अजीमखॉं पठाण, शिवसेना (UBT) घनसावंगी तालुकाप्रमुख संदिप कंटुले, कृ.उ.बाजार समितीचे संचालक व नवनाथ अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले, लोकमतचे पत्रकार दिगंबर गुजर, वास्तव न्यूजचे संपादक ओमप्रकाश उढाण, रोहयोचे माजी तालुकाध्यक्ष रामेश्वर लोया, माजी उपसरपंच अंकुशराव रोकडे, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश तौर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक राजेजाधव, शिवसेनेचे ग्रा.पं.सदस्य रफिक कुरेशी, डॉ.इस्वळे, पत्रकार लक्ष्मण बिलोरे, पत्रकार अशोक कंटुले, पत्रकार गणेश ओझा, अशोकराव ओवळे, परफेक्ट ड्रेसेसचे संचालक एजाज शेख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (SP) शहराध्यक्ष नाजेम पठाण, श्री शैलम को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष धनंजय कंटुले, हारूण शेख, समीर पठाण, प्रा.गणेश कंटुले, आयाज शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस (दिव्यांग सेल) तालकाध्यक्ष मोईन कुरेशी, बाळूसेठ लोया, पुरूषोत्तमम गायकवाड, प्रतिबिंब फोटोचे संचालक शिवाजी जायभाये, अनिल दाड, भागवत राऊत, रामदास शिलवंत, आण्णा काळे, मनोज गायकवाड, अखिल शेख, सुप्रीम मल्टिसर्व्हिसेसचे संचालक शाहेद शेख, हमीद शेख, इम्रान पठाण, अहेमद शेख, मुक्तार सय्यद, सतिष कपाळे, इरशाद पठाण, सज्जू कासमी, विलास काळे, कृष्णा वाघमारे, दिपक ओझा, श्रीहरी जगताप, अनवर पठाण, जमील शेख, अमजद पठाण, नौशाद पठाण, शकील शेख, अशोक काळे, सतिष कपाळे, योगेश घोगरे, बबलू देशमुख, शहजाद पठाण, महेबुब कुरेशी, मौलाना अलीम कुरेशी, किशोर, प्रमोद बहीर, योगेश कानडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

संपादकांचा सत्कार !
नवनाथ अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले यांनी एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या, यावेळी पत्रकार दिगंबर गुजर, रामेश्वर लोया, रमेश तौर यांची उपस्थिती होती, तसेच तिर्थपुरी येथील वास्तव न्यूजचे संपादक ओमप्रकाश उढाण यांनी संपादक परवेज पठाण यांचा सत्कार केला यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

मन:पूर्वक आभार !
दि.१ व दि.२ रोजी वेळेत वेळ काढून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहे. ज्या मान्यवरांचे शुभारंभ कार्यक्रमाला काही कारणास्तव येणे झाले नाही किंवा जे बाहेरगावी होते त्यांनीही मोबाईल फोनवरून संपादकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, शिवाय अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचेही संपादकांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे.