Your Alt Text

छत्रपती संभाजीनगर-परभणी बस सुरू ! संभाजीनगर ते रोहीलागड- अंबड – घनसावंगी- कुंभार पिंपळगांव-आष्‍टी, पाथरी, परभणी मार्गावरील प्रवाशांना दिलासा !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
छत्रपती संभाजीनगर ते परभणी या लांब पल्‍ल्‍याच्‍या मार्गावर बस नसल्‍याने प्रवाशांची अडचण होत होती. अंबड-घनसावंगी-कुंभार पिंपळगाव मार्गे परभणी बस नसल्‍याने प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता, अर्थातच अनेक वाहने बदलून परभणीला जावे लागत होते, परंतू आता ही अडचण दूर झाली आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यात सर्वात मोठी बाजारपेठ कुंभार पिंपळगांव आहे, शिवाय जवळच तिर्थक्षेत्र जांबसमर्थ आहे, या ठिकाणी राज्‍यभरातून भाविक भक्‍त येत असतात, तसेच परिसरातील गावांमध्‍येही विविध धार्मिक स्‍थळे आहेत तेथेही दर्शनासाठी भाविक येत असतात, परंतू लांब पल्‍ल्‍याच्‍या गाड्या नसल्‍यामुळे प्रवाशांना मोठी अडचण येत होती.

छत्रपती संभाजीनगर ते परभणी या मार्गावर लांब पल्‍ल्‍याची बस नसल्‍यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्‍यामुळे या मार्गावरील प्रवाशी तसेच कुंभार पिंपळगांव येथील ग्रामविकास युवा मंच च्‍या वतीने छत्रपती संभाजीनगरचे विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांच्‍याकडे मागणी करण्‍यात आली होती. त्‍यानुसार विभाग नियंत्रक यांनी सर्वांची मागणी व विनंती लक्षात घेवून छत्रपती संभाजीनगर ते परभणी ही एस.टी. बस सुरू केली आहे.

सदरील बस ही तुर्तास छत्रपती संभाजीनगर मधून सकाळी 7 वाजता निघत आहे. (येत्‍या काळात वेळेत बदलही होवू शकतो) बस संभाजीनगरहून रोहिलागड, अंबड, घनसावंगी, कुंभार पिंपळगांव, आष्‍टी, पाथरी मार्गे परभणीला जाणार आहे. त्‍यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.

छत्रपती संभाजीनगर – परभणी बस सुरू केल्‍यामुळे ग्रामविकास युवा मंच व परिसरातील नागरिकांनी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय नियंत्रक सचिन क्षिरसागर, आगार क्र.1 चे आगारप्रमुख संतोष घाणे, सहाय्यक वाहतुक अधिकारी संतोष पोपळघट यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

IMG 20240429 WA0010

कर्मचाऱ्यांचा सत्‍कार !

छत्रपती संभाजीगर – परभणी बसचे कुंभार पिंपळगांव येथे आगमन झाल्‍यानिमित्‍त दि. 27 रोजी कुंभार पिंपळगांव बस स्‍थानकाचे वाहतुक नियंत्रक अरूण घोगरे, तसेच बसचे चालक संतोष कांबळे, वाहक उल्‍हास चव्‍हाण यांचा सत्‍कार ग्रामविकास युवा मंच व नागरिकांच्‍या वतीने करण्‍यात आला आहे. यावेळी परिसरातील प्रवासी व नागरिकांची उपस्थिती होती.

प्रवाशांवर अवलंबून !

सर्व प्रवाशांच्‍या विनंतीवरून छत्रपती संभाजीनगरच्‍या आगारातून छत्रपती संभाजीनगर – परभणी बस सुरू करण्‍यात आली आहे, काही दिवस तर बस सुरूच राहणार आहे. परंतू बसला प्रवाशी मिळणे म्‍हणजेच पर्यायाने उत्‍पन्‍न मिळणे सुध्‍दा आवश्‍यक आहे. कारण मागील काळाचा अनुभव पाहता प्रवासी न मिळाल्‍याने अनेक बसेस बंद झाल्‍या होत्‍या. त्‍यामुळे सदरील बसची माहिती या मार्गावरील प्रवाशांपर्यंत पोहोचवण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!