Your Alt Text

एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त विविध क्षेत्रातील मान्‍यवरांच्‍या काय आहेत प्रतिक्रिया ? वाचा…!

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांचा आज दि.४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून त्‍या निमित्‍त सन्‍माननीय सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी परवेज पठाण यांच्‍या विषयी प्रतिक्रिया दिल्‍या आहेत, सदरील मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रिया त्‍यांच्‍याच शब्‍दात खाली देण्‍यात येत आहेत. तत्‍पूर्वी परवेज पठाण यांच्‍या विषयी थोडक्‍यात माहिती देण्‍यात येत आहे.

परवेज पठाण यांच्‍या बद्दल थोडक्‍यात !

परवेज पठाण हे एल्‍गार न्‍यूज या ऑनलाईन न्‍यूज पोर्टलचे संपादक असून एल्‍गार न्‍यूज च्‍या माध्‍यमातून नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या, संपादकीय आर्टीकल प्रकाशित केले जातात. परवेज पठाण हे पत्रकारिता पदवीधर (Bachelor of Mass Communication & Journalism) असून पत्रकारिता क्षेत्रात मागील १७ वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच मागील २३ वर्षांपासून कॉम्‍प्‍यूटर क्षेत्रातही कार्यरत असून ते एक ग्राफीक डिझायनर सुध्‍दा आहेत. शिवाय त्‍यांनी यापूर्वी विविध विषयांवरील ऑनलाईन ब्‍लॉगवर सुध्‍दा काम केले आहे. परवेज पठाण हे कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील ज्‍येष्‍ठ पत्रकार इब्राहीम पठाण यांचे चिरंजीव आहेत. परवेज पठाण यांना काही दिवसांपूर्वीच “उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार” जाहीर झाला असून त्‍याबद्दल विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी सत्‍कार करून त्‍यांना पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. लवकरच एल्‍गार न्‍यूजचे युट्यूब चॅनल सुध्‍दा सुरू होणार आहे.

वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा !

परवेज पठाण यांचा आज दि.४ रोजी वाढदिवस असून त्‍या निमित्‍ताने विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी आपल्‍या प्रतिक्रियांच्‍या माध्‍यमातून शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. सदरील मान्‍यवरांच्‍या शुभेच्‍छा त्‍यांच्‍याच शब्‍दात खालील प्रमाणे आहेत.


निर्भीडता पत्रकारितेचा विशेष भाग !

एल्गार न्यूजचे संपादक परवेजभाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! त्‍यांच्‍यासारख्‍या प्रतिभावान पत्रकाराची लेखणी सदैव तीक्ष्ण असून त्‍यांचे शब्द नेहमी प्रभाव टाकतात व सत्यावर प्रकाश टाकत असतात. निर्भीडता हा त्‍यांच्‍या पत्रकारितेचा विशेष भाग आहे. त्‍यांनी लेखणीतून नेहमीच समाजातील भीषण प्रश्नाला लेखणीचा विषय बनविला आहे. शब्दांची ताकद जाणणाऱ्या आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते सदैव कटिबद्ध असतात. त्याचप्रमाणे त्‍यांच्‍या दृष्टीक्षेपात असलेल्या माझ्यासारख्या सर्व संघर्षशील व महत्वकांक्षी व्यक्तींना त्‍यांच्‍या लेखणीतून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्‍यांच्‍या सारख्या पत्रकाराची समाजाला खूप आवश्यकता असून त्‍यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्‍छा देतो व त्‍यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो.

रविंद्र शंकरराव तौर
प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य
जिल्हा नियोजन समिती सदस्य जालना
अध्यक्ष- सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ


रोखठोक व निर्भीड लिखाण !

माझे सहकारी मित्र परवेज भाई पठाण यांच्‍या सोबत मी गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करतोय. सुरूवातीपासूनच आमची पत्रकारितेत ओळख झाल्‍यापासून मी पाहत आहे की, त्‍यांची पत्रकारिता ही रोखठोक व निर्भीड आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्‍तंभ असून पत्रकारिता ही कोणाच्‍या दावणीला न बांधता नि:पक्षपणे आपली निर्भीड पत्रकारिता ते जोपासत आहेत. त्‍यांच्‍या जन्‍म दिवसाच्‍या निमित्‍ताने त्‍यांनी भविष्‍यातही आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातून निर्भीड पत्रकारिता करून जनतेला योग्‍य तो न्‍याय द्यावा हीच अपेक्षा. परवेज भाई यांना वाढदिवसा निमित्‍त हार्दिक शुभेच्‍छा….

ओमप्रकाश उढाण,
संपादक, वास्‍तव न्‍यूज २४


सडतोड लिखाण व स्‍वतंत्र शैली !

अनेक वर्षे परवेज भाई यांनी वृत्‍तपत्रात प्रतिनिधी म्‍हणून काम केल्‍यानंतर साधारण दिड वर्षापूर्वी त्‍यांनी स्‍वत:चे एल्‍गार न्‍यूज हे ऑनलाईन न्‍यूज पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून त्‍यांनी नवीन प्रवास सुरू केला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नावर लेखणी झिजवून आणि सडेतोड लिखाण करून त्‍यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्‍यांच्‍या लिखाणाची शैली सुध्‍दा वेगळी असून सर्वसामान्‍यांना आकर्षित करणारी आहे. मध्यतरी त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. परंतू हाडाचा पत्रकार असल्याने शिवाय समोर घडणाऱ्या चुकीच्‍या गोष्‍टींमुळे त्‍यांची घुसमठ होवू लागली, अस्‍वस्‍थता वाढली. शेवटी त्‍यांनी स्‍वत:चे एल्गार न्यूज या नावाने न्यूज पोर्टल सुरू करून परत एकदा त्यांच्यातील असणारा हाडाचा पत्रकार जागा करत जनसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका तेवत ठेवली आहे. त्‍यांच्‍या निर्भीड, नि:पक्ष व रोखठोक पत्रकारितेला सलाम असून आम्‍ही सर्व पत्रकार त्‍यांच्‍या सोबत आहोत. परवेज भाईंना वाढदिवस व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..! अशीच त्यांची उत्‍तरोत्‍तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा……

गणेश जाधव
मुख्य संपादक, दैनिक जालना सूर्योदय


आम्‍ही कायम पाठीशी आहोत !

एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज भाई पठाण निर्भीड व रोखठोक लिखाणासाठी प्रसिध्‍द असून त्‍यांच्‍या याच सडेतोड लिखाणामुळे त्‍यांनी जनसामान्‍यांमध्‍ये आपले एक वेगळे स्‍थान निर्माण केले आहे. त्‍यांच्‍या रोखठोक लिखाणामुळे अनेकदा त्‍यांच्‍यावर दबाव आणण्‍याचा किंवा त्‍यांना अडचणीत आणण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. विजय तर सत्‍याचाच होत असतो, परंतू त्‍यापुढे जावून स्‍पष्‍टपणे नमूद करतो की, आम्‍ही परवेज भाई यांच्‍या कायम पाठीशी आहोत. त्‍यांनी जनसामान्‍यांसाठी अशा प्रकारे निर्भीडपणे काम करत रहावे, बाकी आम्‍ही आहोतच. आज परवेज भाई यांचा वाढदिवस आहे त्‍यानिमित्‍त व पुढील वाटचालीस त्‍यांना मनापासून शुभेच्‍छा…

विष्णू शिंदे
रिपाइं, जिल्हा उपाध्यक्ष (आठवले गट)


मी पाहिलेला भला माणूस !

एल्गार न्‍यूज च्या माध्यमातून परखड लिहीणारा व वास्तव टिपणारा, पत्रकारिता क्षेत्रात तत्पर व सुज्ञ, समयाचं भान असणारा, मनाचा मोठा, पण भावणिक स्वभावाचा, लवचीक, व्यवहारात व वागण्यात प्रामाणिक, सौजन्‍यशील, मधुर भाषी, नेहमी हसतमुख व समाज कार्यासाठी झोकून देणारा,अशा अनेक पैलू, ज्याला आपण अष्टपैलू म्हणू, असा भला माणूस, माझा जिवलग मित्र, परवेज भाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

अशोक राजे जाधव
जिल्हा उपाध्यक्ष जालना,
भारतीय जनता पार्टी


एक निर्भीड पत्रकार !

एक निर्भीड व रोखठोक पत्रकार म्‍हणून परवेज भाई सर्वत्र परिचित आहेत. गाव, परिसरासाठी तसेच तालुक्‍यातील जनतेसाठी लेखणीच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे सतत प्रयत्‍न सुरूच असतात. जिल्‍ह्यातील व राज्‍यातील अनेक महत्‍वपूर्ण प्रश्‍न सुध्‍दा ते रोखठोकपणे मांडत असतात. सर्वसामान्‍य जनतेसाठी काहीतरी करण्याची त्‍यांची तळमळ वारंवार दिसून येते, आपल्या मित्रांच काही चांगलं होत असेल तर सरळ भावनेने मदत करणारे माझे मित्र परवेज भाई पठाण यांना त्‍यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त व पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्‍छा…

संदीप कंटूले,
शिवसेना (UBT)
तालुका प्रमुख, घनसावंगी


परवेज भाई एक उत्कृष्ट पत्रकार

पत्रकारिता हे एक जबाबदारीचं क्षेत्र आहे. समाजातील घटनांचे निर्भीडपणे दर्शन घडवणारे, सत्याचा शोध घेणारे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणारे पत्रकार हे लोकशाहीचे खरे चौथे स्तंभ आहेत. उत्कृष्ट पत्रकार म्हणजे केवळ शब्दांचे जादूगार नव्हेत, तर सत्य शोधण्याचा ध्यास घेणारे योद्धे असतात. समाजातील अंधारलेल्या कोपऱ्यात प्रकाश टाकण्याचे त्यांचे कार्य अमूल्य आहे. त्यांच्यासाठी ना कुठलाही दबाव महत्त्वाचा असतो, ना कुठलाही स्वार्थ. लोकशाहीच्या रक्षणासाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी, आणि सत्याच्या विजयासाठी ते अहोरात्र परिश्रम करतात.
आजच्या डिजिटल युगात, जेव्हा खोटी माहिती आणि अपप्रचाराचा सुळसुळाट वाढला आहे, तेव्हा खऱ्या आणि निष्ठावान पत्रकारांची गरज अधिक भासते. सत्य सांगण्यासाठी जेव्हा कुणी धाडसाने पुढे येतो, तेव्हा तो केवळ एक पत्रकार नसतो, तर तो समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ असतो. अशा निर्भीड, निःपक्षपाती आणि सत्याच्या शोधात अविरत झटणाऱ्या मा.परवेजभाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक सलाम ! त्यांचे कार्य सतत प्रेरणादायी राहो आणि त्यांच्या लेखणीची धार कायम राहो हीच सदिच्‍छा….

पुरूषोत्‍तम गायकवाड,
संचालक, वंदना आर्ट्स, कुं.पिंपळगांव


प्रवास खूप खडतर होता !

आमचे मित्र व एल्गार न्यूज चे संपादक सन्माननीय परवेझ भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… त्‍यांच्‍या सृजनशील व चिकित्सक निरिक्षणातून कुंभार पिंपळगाव व परिसरातील समस्यांसह अनेक सकारात्मक बाबींकडे त्यांचे लक्ष असते. व्यक्तिमत्व बहुआयामी तेव्हाच बनते जेव्हा सर्व स्तरातील सर्वाभिमुख भूमिका घेण्याची निर्णय क्षमता व्यक्तींमध्‍ये असते. त्यांचा सामान्य पत्रकारिता ते संपादकीय प्रवास हा खूप खडतर होता, परंतु चिकाटी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा त्यांना प्रेरणा देत गेला, आमच्या स्नेही बंधूंना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्‍छा…

धनंजय कंटुले,
अध्‍यक्ष, श्रीशैलम अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी


लेखणीच्‍या माध्यमातून न्याय !

एल्गार न्यूज चे संपादक परवेज भाई पठाण यांनी त्‍यांच्‍या लेखणीच्‍या माध्यमातून सर्व सामान्यांना आजपर्यंत न्याय दिलेला आहे आणि यानंतरही त्‍यांच्‍या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्‍यांना ते न्याय देताल अशी खात्री आहे. परवेज भाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

अविनाश घोगरे
(पत्रकार, घनसावंगी)


सर्वांना सोबत घेऊन चालनारे पत्रकार !

पत्रकारिता असो वा शिक्षण क्षेत्र, सामाजिक कार्य, धार्मिक कार्य असो वा कौटुंबिक कार्यक्रम सर्वच ठिकाणी कायम उत्साहाने सहभागी असणारे तसेच कितीही अडचणी व अपयश आले तरी खचून न जाता त्यावर प्रयत्न आणि संघर्षातून परिस्थिती वर मात करणारे आमचे सहकारी, सर्वांना सोबत घेऊन चालनारे पत्रकार मित्र परवेज भाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

गणेश ओझा
(पत्रकार, कुंभार पिंपळगांव )


रोखठोक पत्रकार !

रोखठोक, निर्भीड तसेच प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून ती आपल्या लेखणीच्‍या माध्‍यमातून जगासमोर आणणारे पत्रकार म्‍हणजेच परवेज भाई… त्‍यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त त्‍यांना मनापासून शुभेच्‍छा….

सोनाजी कंटुले (फार्मासिस्‍ट)


जनसामान्‍यांसाठी लढणारा पत्रकार

पत्रकारिता कशी असावी याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजेच एल्गार न्यूजचे संपादक परवेज भाई पठाण होय. आपल्या प्रकट लेखणी द्वारे वस्तुस्थिती मांडण्याचा नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. सामाजिक सलोखा असो, नागरिकांच्या समस्या असो, अवैध धंदे असो किंवा इतर विषय असो ते कायम रोखठोकपणे मांडत असतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा मोठा धाडस ते दाखवत असल्याने अनेक लोकांनी त्‍यांच्‍यावर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केला परंतू ते डगमगले नाही. सातत्‍याने विविध विषयांवर परखडपणे ते लिहीत असतात. मागील काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्या लेखणी द्वारे पाण्याचे वास्तव मांडले यावर बरीचशी चर्चा सुद्धा झाली, बेधडक पत्रकारितेबद्दल त्‍यांना 10 पैकी 10 मार्क नक्‍कीच देता येतील. एक उच्चशिक्षित, पत्रकारितेची पदवी घेवून जनसामान्‍यांसाठी लढणारा पत्रकार कुंभार पिंपळगाव मध्ये आहे हे गौरवपूर्ण भाग्य आहे. त्‍यांच्‍या सडतोड लेखणीमुळे प्रशासकीय यंत्रणेवर धाक निर्माण होतो. खरंच परवेज भाई यांचे कार्य कौतुकास्पद असून त्‍यांना वाढदिवसा निमित्‍त मनापासून शुभेच्‍छा…

अंकुश कंटूले,
राजमुद्रा डेली नीड्स,
कुंभार पिंपळगांव


रोखठोक लिखाण !

आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातून सर्वसामान्‍य जनतेचे प्रश्‍न निर्भीड व रोखठोकपणे मांडणारे आमचे परम मित्र, निष्पक्ष पत्रकार, लेखणीचे धनी, नम्र स्‍वभावाचे, प्रामाणिक, मृदुभाषी, मनमिळाऊ, माझे जिवलग मित्र परवेज भाई पठाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अल्लाह त्‍यांना नेहमी सुखी व आनंदी ठेवो हीच सदिच्‍छा…

हमीद शेख,
शहराध्‍यक्ष, कुं.पिंपळगांव
राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेस (SP)


एक प्रामाणिक पत्रकार !

एल्गार न्‍यूज चे संपादक तथा आमचे सर्वांचे लाडके परममित्र परवेज भाई पठाण हे वेळोवेळी आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य विषयक अशा विविध विषयांवर रोखठोकपणे लिखाण करत असतात. सर्वसामान्‍य जनतेचे मुलभूत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आपल्या लेखणीतून सातत्याने प्रयत्‍नशील असतात. एल्गार न्‍यूज च्‍या माध्‍यमातून विविध विषयाला वाचा फोडण्याचे काम गेल्‍या अनेक वर्षांपासून एक प्रामाणिक सामाजिक पत्रकार म्हणून ते करत आहेत. परवेज भाई यांना त्यांच्या वाढदिवस निमित्ताने पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य लाभो तसेच त्यांच्या लेखणीतून पुढील काळातही अशाच प्रकारे सर्व सामान्य नागरिकांनचे मुलभूत प्रश्न सुटावे हिच ईश्वरचरणी पुनः प्रार्थना.

भागवत राऊत,
ग्रामविकास युवा मंच, कुं.पिंपळगांव


एल्‍गार न्‍यूजची सर्वत्र चर्चा

या एल्गार न्‍यूज ने नुसत्या घनसावंगी तालुक्‍यातच नवे तर संपूर्ण जालना जिल्‍ह्यात आणि जिल्‍ह्याबाहेर सुध्‍दा एल्गार केला आहे. निष्‍पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍यांमुळे एल्‍गार न्‍यूजची सर्वत्र चर्चा आहे. संपादक परवेज भाई पठाण या एल्गार न्‍यूज च्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत. घनसावंगी तालुक्‍यातील अनेक प्रकरणे बाहेर काढून अनेक वर्षांपासून झालेल्या भ्रष्टाचाराला एल्गार न्‍यूजने धारेवर धरून चांगलेच पाणी पाजण्याचे काम केले आहे. नक्कीच एल्गार न्‍यूज एक अथांग भरारी घेऊन एल्गार चे वटवृक्ष बनेल ही मला खात्री आहे. एल्गार न्‍यूज चे सन्माननीय संपादक परवेज भाई पठाण यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

किशोर मुनेमाणिक,
जांबसमर्थकर.


अन्‍याया विरूध्‍द लेखणी !

एल्‍गार न्‍यूजचे संपादक मा.परवेज भाई यांना वाढदिवसाच्‍या मनापासून शुभेच्‍छा… परवेज भाई यांनी पत्रकारिता क्षेत्रात स्‍वत:च्‍या हिंमतीवर धैर्याने मात करून यशस्‍वी वाटचाल करीत घनसावंगी तालुक्‍यात व जिल्‍ह्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्‍या पत्रकारितेच्‍या माध्‍यमातून सामान्‍य नागरिकांच्‍या प्रश्‍नांना वाचा फोडून, अन्‍याया विरूध्‍द लेखणीतून प्रखर लढा दिला आहे व देत आहेत. सर्व सामान्‍यांना न्‍याय देणारं निर्भीड व्‍यक्‍तीमत्‍व तसेच आपल्‍या कार्यशैलीतून, मित्रप्रेमाची जोपासना करणाऱ्या व्‍यक्‍तीमत्‍वाला वाढदिवसाच्‍या मनापासून हार्दिक शुभेच्‍छा ! परवेज भाई यांना निरोगी व दिर्घ आयुष्‍य लाभो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

महेशकुमार दाड (पप्‍पूसेठ)
कुंभार पिंपळगांव


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!