Your Alt Text

मराठवाडा साहित्‍य परिषदेच्‍या जिल्‍हाध्‍यक्षपदी रविंद्र तौर, तर सचिवपदी पंडित तडेगावकर

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
मराठवाडा साहित्य परिषद जालना शाखेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली असून अध्यक्षपदी रवींद्र तौर याची निवड करण्‍यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी डॉ. प्रभाकर शेळके, ॲड. विलास भुतेकर, सचिव पंडितराव तडेगावकर, सहसचिव पदी बाळासाहेब तनपुरे, डॉ. ज्योती धर्माधिकारी, तर कोषाध्यक्ष पदी डॉ. शशिकांत पाटील यांची निवड झाली आहे.

आगामी कार्यकारिणी निवडीसाठी रविवारी ( ता. ०६) आजीव सभासदांची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. यावेळी मसाप केंद्रीय कार्यकारिणी संचालक डॉ. संजीवनी तडेगावकर, सुभाष कोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्राचार्या डॉ.सुनंदा तिडके यांनी कार्यकारिणीची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.

उर्वरित कार्यकारिणी

कार्यकारिणी सदस्य : शिवाजी कायंदे,ॲड. सतीश तवरावाला, लक्ष्मीकांत दाभाडकर, राजाराम जाधव , शांतीलाल बनसोडे ,श्रीकांत गायकवाड, प्रा .भगवंत ठाले , प्रा. मुकुंद कुलकर्णी, डॉ. शोभा यशवंते, रमाकांत कुलकर्णी, प्रा. रंगनाथ खेडेकर, प्रा. सुधाकर जाधव, डॉ. राजक्रांती वलसे, डॉ. संदीप पाटील, डॉ. गजानन जाधव, डॉ. यशवंत सोनुने, प्रा. राम कदम, डॉ. पंडित रानमाळ, कैलास भाले , कविता नरवडे ,प्रा .जयश्री वाढेकर असून निमंत्रित सदस्य : डॉ. संजीवनी तडेगावकर, सुभाष कोळकर, प्रा. रमेश भुतेकर आहेत.

सल्लागार समिती

रेखा बैजल,ॲड.विनायक चिटणीस, सी. ए. गोविंद प्रसाद मुंदडा, गुलाब पाटील, विमल आगलावे, राम गायकवाड, विनीत साहनी, शिवकुमार बैजल, डॉ. सुनंदा तिडके, प्रा. राम अग्रवाल, आर .आर.खडके, ज्ञानदेव पायगव्हाणे, प्रा. बसवराज कोरे, प्रा. रावसाहेब ढवळे, डॉ. शिवाजी मदन, प्रा. नारायण बोराडे, इंजि. एस. एन. कुलकर्णी, डॉ. जगन्नाथ खंडागळे, ॲड. शिवाजी आदमाने, डॉ. संजय लाखे पाटील, राजेंद्र राख, राजेश राऊत, राम सावंत, डॉ. उध्दव थोरवे,अशोक तारडे, इंजि. रवींद्र हुशे, ज्ञानेश्वर कदम, प्रा. विलास भुतेकर, प्रभा जाधव, प्रकाश कुंडलकर, यांचा समावेश आहे. बैठकीस आजीव सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!