Your Alt Text

कुंभार पिंपळगावात मराठा समाजाच्‍या वतीने रास्‍ता रोको आंदोलन !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राज्‍यभरात मराठा समाजाच्‍या वतीने विविध मागण्‍यांसाठी रास्‍ता रोको आंदोलन करण्‍यात येत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्‍या सूचनेनुसार दि.24 रोजी कुंभार पिंपळगांव येथील मराठा समाज बांधवांच्‍या वतीने रास्‍तो रोको आंदोलन करून पोलीस व प्रशासनाला निवेदन देण्‍यात आले.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, मराठा समाजाच्‍या विविध मागण्‍यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषण करीत आहेत. सगेसोयऱ्याच्‍या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करण्‍यात यावी, आंदोलकांवरील गुन्‍हे मागे घेण्‍यात यावेत, मनोज जरांगे पाटील यांच्‍यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्‍यात यावी इत्‍यादी मागण्‍यासांठी सर्कल मधील सकल मराठा समाजाच्‍या वतीने कुंभार पिंपळगांव येथे शनिवार दि.24 रोजी रास्‍ता रोको आंदोलन करण्‍यात आले.

यावेळी अंबड – पाथरी रोडवर दोन्‍ही बाजूने वाहनांच्‍या लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. याप्रसंगी आंदोलकांनी विविध घोषणा देवून प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ, तलाठी संदिप नरूटे यांच्‍यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्‍या वतीने आवश्‍यक तो बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता.

रास्‍ता रोको आंदोलनाच्‍या वेळी समाज बांधवांमध्‍ये सोनाजी कंटुले, बंडू कंटुले, दत्‍तात्रय कंटुले, कौतिक घुमरे, भगवान कंटुले, अतुल कंटुले, संजय कंटुले, पिंटू जाधव, सिध्‍दू कंटुले, रमेश कंटुले, गोरख सुरासे, रमेश कंटुले, कैलास नखाते, रखमाजी सुरासे, मारोती शिंदे, आकाश आर्दड, माऊली सुरासे, संजय सुरासे, गणेश काळे, हनुमंत आर्दड, अशोक कंटुले, डिगांबर कंटुले, संभाजी नाईक, प्रकाश बिलोरे, गणेश नाईकनवरे, कृष्‍णा कंटुले, संतोष कंटुले, दिनकर काळे, रामभाऊ बिलोरे, बाबासाहेब सुरासे, विठ्ठल कंटुले, परमेश्‍वर कंटुले, आकाशा भोसले, नाना शिंदे, तुकाराम सुरासे, संदिप खालापुरे, आसाराम सुरासे, अर्जुन कंटुले यांच्‍यासह कुंभार पिंपळगांव सर्कल मधील मराठा समाज बांधव मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.


इतर बातम्‍या खाली पाहू शकता…

तसेच बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!