एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे दि.१२ रोजी राजमाता मॉं जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता मां जिजाऊ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे (स्मारकाचे) अनावरण करण्यात आले. तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. सदरील रक्तदान शिबीरात ८६ जणांनी रक्तदान केले.
राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ चौक, मातोश्री कॉर्नर, कुंभार पिंपळगाव या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राजे आर्दड परिवाराच्या वतीने मातोश्री कॉर्नर येथे उभारण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, यावेळी उपस्थितांनी अभिवादन केले. याप्रसंगी श्रीमंत भागवत मानसिंग राजेजाधव, आमदार डॉ.हिकमत उढाण, व्याख्याते अमोल तौर, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब राजे, सुरेश ठाकरे, वसंतराव उढाण, विठ्ठल बापू कंटुले, धीरजसिंह मोहिते, वरदसिंह मोहिते, डॉ.सतिष देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शिवव्याख्याते अमोल तौर यांचे व्याख्यानही झाले.
पुतळ्यासाठी योगदान देणारे दत्तात्रय आर्दड, कैलासराव आर्दड, डिगांबर आर्दड, उमाबाई आर्दड, अंजली आर्दड इत्यादी मान्यवरांचा गावकरी व आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी जि.प. सदस्य अन्सीराम कंटुले यांच्या हस्ते अमोल तौर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवानराव तौर यांनी केले तर सूत्रसंचालन सोनाजी कंटुले यांनी केले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्व जाती धर्मातील नागरिक उपस्थित होते.