Your Alt Text

भारतीय बौद्ध महासभा घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी बौद्धाचार्य राजकुमार खरात

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
भारतीय बौद्ध महासभेच्‍या वतीने नुकतीच जालना जिल्‍ह्यातील घनसावंगी येथील शासकीय विश्रामामगृह येथे बैठक आयोजित करण्‍यात आली होती, या बैठकीत भारतीय बौद्ध महासभा घनसावंगी तालुकाध्यक्ष पदी बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ खरात यांची एकमताने निवड करण्‍यात आली आहे.

भारतीय बौद्ध महासभा सभेचे जालना जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली, त्यावेळी जालना जिल्ह्याचे सरचिटणीस राजेश सदावर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाला होता त्यामुळे कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची निवड करण्‍यात आली.

सदरील बैठकीत सर्वानुमते नविन तालुकाध्यक्षपदी बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ खरात यांची जिल्हा अध्यक्ष महेंद्र बनकर यांच्या हस्ते निवड करण्यात आली. यावेळी महेंद्र बनकर यांनी तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ खरात यांचा सत्कार केला. यावेळी जालना जिल्ह्याचे सरचिटणीस राजेश सदावर्ते यांनीही स्वागत केले. यानंतर उपस्थित माजी सभापती बन्सीधर शेळके, वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर खरात, माजी तालुका अध्यक्ष पंढरीनाथ मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

यानंतर कामाचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर सर्वांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी देवीदास कोळे, गणेश वाघमारे, लक्ष्मण कोळे, मधुकर खरात, श्रीरंग वाघमारे, व्ही. टि. पटेकर, केंद्रीय शिक्षक भिकाजी गाढे, बाळासाहेब सोनवणे (वंचित तालुका महासचिव) समाधान थोडके (वंचित तालुका अध्यक्ष), बाबासाहेब गालफाडे, द्वारकाताई झोटे, प्रभाकर बनसोडे, सुदाम गणकवार, सुशांत साबळे, सुनील साळवे, भास्कर साळवे, डॉ. वाघमारे, श्रीरंग आव्हाड, जनार्धन शिंदे, संदीप दाभाडे, संदिप येडे, ज्ञानदेव घायतडक डि. एल. घायतडक, सुभाष घायतडक, सुखदेव घायतडक, जितेंद्र शिंदे, सुमित्रा काकु शिंदे, कौशल्याबाई शिंदे, विमल ताई गायकवाड व अन्नासाहेब साबळे, गौतम घायतडक, राजेंद्र पाईकराव, बाबासाहेब गायकवाड, बाबुराव गायकवाड, विलास गायकवाड, रामेश्वर गायकवाड, ॳॅड. गाडेकर, विठ्ठल येडे, सुधाकर रंधवे, धर्मराज भालेकर, ईत्यादिंची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ खरात याचे भरभरून स्वागत केले व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.

ठिकठिकाणी स्‍वागत व शुभेच्‍छा !

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे सुध्‍दा अनेक मान्‍यवरांनी बौद्धाचार्य नानाभाऊ खरात यांचे स्‍वागत करून शुभेच्‍छा दिल्‍या. त्‍यांच्‍या निवडीबद्दल अनुरथ (चाचू) गाढे, पुरूषोत्‍तम गायकवाड, जनार्धन शिंदे, संदिप दाभाडे, ॲड. प्रदिप गाढे साहेब, जितेंद्र सदर, विश्वनाथ शिंदे, रामभाऊ जाधव, आनंद साळवे, राधा किसन साळवे, राहुल साळवे, विशाल साळवे, सचीन शिंदे, सुशिल शिंदे, विकास शिंदे, रमेश साळवे, अरूण दाभाडे, प्रविण शिंदे, ऊततमबाबा शिंदे, वडमारे,, सुनिल शिंदे, सुरेश शिंदे, प्रभाकर बनसोडे, पंढरीनाथ मस्के, संभाजी कांबळे, ज्ञानदेव घायतडक, हेमंत शिंदे व इतर बौद्ध उपासक उपासिका यांनी स्वागत करून अभिनंदन केले.

आनंदविहार येथे स्‍वागत !

भारतीय बौद्ध महासभेच्‍या घनसावंगी तालुकाध्यक्ष पदी बौद्धाचार्य राजकुमार खरात यांची निवड झाल्‍याबद्दल कुं. पिंपळगाव येथे आनंद बुद्ध विहार, रमाई नगर येथे त्‍यांचे स्‍वागत करून शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या. यावेळी बौद्धाचार्य गवळी सर्व बौद्ध उपासक- उपासिका, बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अश्विन पोर्नीमेच्या निम्मित्‍ताने बौद्धाचार्य राजकुमार खरात यांचा सत्कार करण्यात आला.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!