Your Alt Text

शांत, संयमी व जनसामान्‍यांचे नेतृत्‍व म्‍हणजे राजेश भैय्या टोपे…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राज्‍यात घनसावंगी मतदारसंघाचा जेव्‍हा कधी उल्‍लेख होतो तेव्‍हा माजी आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांचे नाव साहजिकच समोर येते. राजेश टोपे यांनी उच्‍च शिक्षणमंत्री असतांना शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी आणि विद्यार्थ्‍यांच्‍या कल्‍याणासाठी प्रयत्‍न केले. स्‍वत: उच्‍च शिक्षित असल्‍याने त्‍यांना शिक्षणाचे महत्‍व माहित होते अशी भावना लिंबीचे सरपंच सुशिल तौर यांनी व्‍यक्‍त केली आहे.

माजी मंत्री राजेश टोपे यांचा दि.११ रोजी वाढदिवस असल्‍याने त्‍यांच्‍या बद्दल आपल्‍या भावना एल्‍गार न्‍यूजकडे व्‍यक्‍त करतांना लिंबी (ता.घनसावंगी) चे सरपंच सुशिल तौर म्‍हणाले की, कोरोना काळात तर देशात आपत्‍कालीन परिस्थिती निर्माण झाली होती, राज्‍यात सुध्‍दा कोरोनामुळे आरोग्‍य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता, परंतू आपल्‍या कार्यकुशलता आणि योग्‍य नियोजनामुळे भैय्यासाहेबांनी अत्‍यंत बारकाईने परिस्थिती हाताळली, रूग्‍णांवर तातडीने उपचार कसे करता येतील या दृष्‍टीने त्‍यांनी प्रयत्‍न केले.

कोरोना काळात आरोग्‍य मंत्रालय सक्षमपणे हाताळल्‍या बद्दल राजेश भैय्या यांचे देशपातळीवर सुध्‍दा नाव झाले. स्‍वत:च्‍या घनसावंगी मतदारसंघातही कोव्‍हीड (कोरोना) च्‍या रूग्‍णांना तातडीने उपचार होण्‍यासाठी घनसावंगी व इतर अनेक ठिकाणी त्‍यांनी चांगली व्‍यवस्‍था केली, योग्‍य उपचार मिळाल्‍यामुळे बहुतांश रूग्‍ण बरे होवून घरी परतले.

स्‍वर्गीय अंकुशराव टोपे यांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात केलेले भरिव कार्य घनसावंगी तालुक्‍यासह जिल्‍ह्याला माहित आहे. शाळा, महाविद्यालय, कारखाना अशा माध्‍यमातून हजारो लोकांना नोकरी आणि रोजगार मिळवून दिले. स्‍व.अंकुशराव टोपे यांच्‍या माध्‍यमातून शिक्षण आणि सहकार चळवळीला राजेश टोपे यांनी पुढे नेत या दोन्‍ही क्षेत्रात भरीव कार्य केले.

मोठ्या साहेबांचे निधन झाल्‍यानंतर समर्थ शिक्षण संस्‍था आणि त्‍यां अंतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच अंबड व घनसावंगी मतदारसंघासाठी वरदान ठरलेल्‍या समर्थ व सागर कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्‍नती करण्‍याच्‍या वाटचालीत भैय्यासाहेबांची मोठी भुमिका आहे. उसाचे क्षेत्र वाढले असले तरी दोन्‍ही कारखान्‍याची क्षमता वाढवण्‍यात आल्‍याने पुढील काळात सुध्‍दा ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

घनसावंगी मतदारसंघाच्‍या विकासासाठी राजेश भैय्या टोपे यांनी सातत्‍याने प्रयत्‍न केले व आजही सुरूच आहे. मागील काळात त्‍यांनी मतदारसंघातील गावांना विकासासाठी विविध योजनांच्‍या माध्‍यमातून निधी उपलब्‍ध करून दिला. अर्थातच मतदारसंघात कोट्यावधीची विकासकामे झाली आहेत. यंदाच्‍या निवडणुकीत अवघ्‍या काही मतांमुळे ते विजयी होवू शकले नसले तरी त्‍यांनी जनसेवेचे कार्य सुरूच ठेवले आहे. दि.११ रोजी त्‍यांचा वाढदिवस आहे. शांत, संयमी व जनसामान्‍यांचे विकासशील नेतृत्‍व असलेल्‍या राजेश भैय्यांना वाढदिवसाच्‍या मनापासून शुभेच्‍छा देतो अशी भावना सरपंच सुशिल तौर यांनी व्‍यक्‍त केली आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!