Your Alt Text

कुंभार पिंपळगावात राजेश टोपे यांना मोठा धक्‍का ! रफिक कुरेशी व असंख्‍य कार्यकर्त्‍यांचा शिवसेनेत प्रवेश !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्‍य रफिक कुरेशी यांनी त्‍यांचे सहकारी व असंख्‍य कार्यकर्त्‍यांसह डॉ.हिकमत उढाण यांच्‍या उपस्थितीत दि.5 रोजी शिवसेनेत प्रवेश केला आहे. रफिक कुरेशी यांच्‍या शिवसेना प्रवेशामुळे मविआचे उमेदवार माजी मंत्री राजेश टोपे यांना मोठा झटका मानला जात आहे.

रफिक कुरेशी हे राष्‍ट्रवादी कॉंग्रेस मध्‍ये गेल्‍या अनेक वर्षांपासून कार्यरत होते, शिवाय कुंभार पिंपळगांवसह घनसावंगी तालुक्‍यातही त्‍यांचा चांगला संपर्क आहे. महायुतीचे विधानसभेचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण यांच्‍यावर विश्‍वास ठेवून त्‍यांनी असंख्‍य कार्यकर्त्‍यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ग्रा.पं.सदस्‍य रफिक कुरेशी यांच्‍यासह माजी ग्रामपंचायत सदस्‍य हस्‍नुभाई शेख, माजी ग्रामपंचायत सदस्‍य सादेक शेख, शफिक कुरेशी सय्यद भाई, फेरोज पटेल, अन्‍सार शेख, गणी शेख, अली शेख, मतीन कुरेशी, मोहंमद कुरेशी, नदीम कुरेशी, समीर कुरेशी, सद्दाम कुरेशी, शकील कुरेशी यांच्‍यासह शंभर पेक्षा जास्‍त युवक व कार्यकर्त्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केल्‍याचे रफिक कुरेशी यांनी सांगितले. पक्ष प्रवेशावेळा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्ष का सोडला ?

याबाबत एल्‍गार न्‍यूजशी बोलतांना रफिक कुरेशी यांनी सांगितले की, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे हे अनेक वर्षे मंत्री होते, सलग आमदार राहिलेत तरीही त्‍यांनी वर्षानुवर्षे मुस्लिम समाजाचे प्रश्‍न प्रलंबित ठेवले. राजेश टोपे यांनी मुस्लिम समाजाच्‍या कामांकडे अनेक वेळा सांगुनही दुर्लक्ष केले, गावातील समस्‍यांकडे दुर्लक्ष केले. समाजातील काही मोजक्‍याच लोकांना हाताशी धरून सर्व समाजाला गृहीत धरण्‍यात आले. वारंवार चॉकलेट देवून तालुक्‍यातील मुस्लिम समाजाला वाऱ्यावर सोडून देण्‍यात आले. वर्षानुवर्षे फक्‍त आश्‍वासनच मिळत असल्‍याने तालुक्‍यातील मुस्लिम समाज नाराज आहे असेही रफिक कुरेशी म्‍हणाले.

तसेच मुस्लिम समाज राहत असलेल्‍या गांव वस्‍त्‍यांमध्‍ये रस्‍ते, पाणी, वीज अशा मुलभूत समस्‍या तर आहेच शिवाय समाजाच्‍या शिक्षण, रोजगाराचा प्रश्‍नही गंभीर आहे, समाजाच्‍या युवकांना नोकरी किंवा रोजगारासाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले नाही, योजनांच्‍या माध्‍यमातून कर्ज प्रकरणासाठी प्रयत्‍न केले नाही, संस्‍था, शाळा किंवा कारखान्‍यात मुस्लिम नसल्‍यातच जमा आहे. एकतर भेट होत नाही, मात्र तरीही राजेश टोपे यांना कसेबसे अनेकदा प्रत्‍यक्ष भेटून सत्‍य परिस्थिती सांगितली परंतू दरवेळी फक्‍त आश्‍वासनच देण्‍यात आले.

समाजाच्‍या प्रश्‍नासाठी राजेश टोपे यांच्‍याशी थेट संपर्क साधण्‍याची सोय नाही. केव्‍हाही फोन लावल्‍यास त्‍यांचे पीए म्‍हणायचे की, साहेब मिटींग मध्‍ये आहेत, सभेत आहेत किंवा बाहेर गेलेले आहेत असे बोलून टाळण्‍यात आले, त्‍यांचे पीए आमदारापेक्षा स्‍वत:ला मोठे समजतात आणि मर्जीतल्‍या लोकांना सोडून समाजातील इतरांना दुर्लक्ष करतात आणि दुजाभावाची वागणूक देतात. वारंवार समाजाला गृहीत धरण्‍यात येत असल्‍यामुळे आणि समाजावर अन्‍याय होत असल्‍यामुळे आम्‍ही कार्यकर्त्‍यांनी पक्ष सोडण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे रफिक कुरेशी यांनी सांगितले.


fasfasdfadfsadsfasd
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!