पोलीस कर्मचारी सोमनाथ झेंडे यांनी Dream 11 हा गेम खेळून दिड कोटी रूपये जिंकले होते, परंतू त्यांनी पोलीस वर्दीत असतांना शिवाय कर्तव्यावर असतांना सदरील गेम खेळला तसेच माध्यमांमध्ये मुलाखती देवून या गेमचे उदात्तीकरण केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. परंतू सदरील Dream 11 नेमका गेम काय हे पाहुया.
ड्रीम 11 ॲप काय आहे ?
ड्रिम 11 ही एक आपल्याकडीलच फॅन्टसी गेमिंग कंपनी आहे. या ड्रिम 11 चे मोबाईल अॅप सुध्दा आहे. या अॅपच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी इत्यादी खेळांमधील दोन्ही संघातील खेळाडू एकत्र करून खेळणारा व्यक्ती एक टीम तयार करू शकतो.
उदाहरणार्थ भारत vs ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याच्या काळी वेळ आधी दोन्ही संघातील खेळाडू घेवून एक टीम बनवावी लागते, बजेटनुसार कॉन्टेस्ट सिलेक्ट करावा लागतो, निवडलेल्या खेळाडूंनी सामन्यात जर चांगली कामगिरी केली तर अधिकाधिक पॉईंट्स मिळतात, ज्या व्यक्तीला सर्वात जास्त गुण मिळतात तो जिंकतो.
येथे सविस्तर माहिती देत नाही, कारण काही जण पुन्हा ही माहिती पाहून खेळायला सुरूवात करू नये. जुगार हा जुगारच असतो, त्याचे समर्थन करता येणार नाही. कारण जुगारामध्ये एखादा जिंकत असतो परंतू अनेकजण बर्बाद होत असतात.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.