Your Alt Text

Dream 11 वर दीड कोटी जिंकणाऱ्या PSI चे निलंबन…! कारण… | PSI Somnath Zende Suspended

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
PSI Somnath Zende Suspended : ऑनलाईन गेम ड्रीम 11 खेळून रातोरात करोडपती झालेल्‍या PSI सोमनाथ झेंडेवर अखेर कार्यवाही करण्‍यात आली आहे. पुण्‍यातील पिंपरी चिंचवड येथील पीएसआय सोमनाथ झेंडे हे ड्रीम 11 हा ऑनलाईन गेम खेळून कोट्यावधीश झाले होते, परंतू त्‍यांचा आनंद जास्‍त काळ टिकू शकला नाही.

पोलीस दलात कर्तव्‍यावर असतांना अनेक गोष्‍टींची काळजी घ्‍यावी लागते, जुगाराला आपल्‍याकडून कोणत्‍याही प्रकारे प्रोत्‍साहन मिळणार नाही याची विशेष खबरदारी घ्‍यावी लागते, किंबहुना जुगार थांबवण्‍याचे प्रयत्‍न करावे लागते, कारण आपल्‍याकडे जुगार खेळण्‍यावर बंदी आहे.

एखादा पोलीस कर्मचारीच जर ऑनलाईन जुगारचा गेम खेळत असेल तर युवक किंवा समाजावर त्‍याचा काय परिणाम होईल, युवकांना अशा प्रकारचे जुगाराचे गेम खेळण्‍यास प्रोत्‍साहन मिळणार नाही का ? याचा विचार संबंधित कर्मचाऱ्याने केलेला दिसत नाही.

PSI Somnath Zende Suspended

जुगार हा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो तो जुगारच असतो, जुगारामुळे आतापर्यंत अनेक परिवार उध्‍वस्‍त झाले आहेत, देशोधडीला लागले आहेत, अनेकांनी तर आपले जीवनही संपवले आहे. दुर्देवाने सदरील ऑनलाईन गेम आपल्‍याकडे सध्‍या सर्रासपणे सुरू आहेत.

देशात सदरील ऑनलाईन गेमला परवानगी असल्‍याचा दावा करण्‍यात येत असला तरी अनेक राज्‍यात यावर बंदी सुध्‍दा आहे. मात्र तरीही पोलीस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्‍या जुगाराला प्रोत्‍साहन देता येत नाही किंवा त्‍याचे उदात्‍तीकरण करता येत नाही.

तरूण अशा प्रकारच्‍या ऑनलाईन गेमच्‍या आहारी जावू नये आणि त्‍यात त्‍यांची फसवणूक होवू नये किंवा ते बर्बाद होवू नये म्‍हणून पोलीसांनी जनजागृती करणे गरजेचे असते, परंतू संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने मुलाखती देवून या गेमचे उदात्‍तीकरण केले. त्‍यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला.

सदरील पीएसआय झेंडे यांनी ऑनलाईन जुगाराला प्राधान्‍य दिले, विशेष म्‍हणजे ते कर्तव्‍यार असतांना किंवा वर्दीत असतांना ते Dream 11 हा गेम खेळले शिवाय जिंकल्‍यावर वर्दीत माध्‍यमांना मुलाखती दिल्‍या, त्‍यांची हीच चूक त्‍यांना भोवली आणि त्‍यांची चौकशी होवून त्‍यांना निलंबित करण्‍यात आले आहे. अधिक माहिती पुढील प्रमाणे…

Dream 11 हा जुगार म्‍हणजे काय ? येथे क्लिक करा….

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!