Your Alt Text

कुंभार पिंपळगावात अनेक दिवसांपासून घंटागाडी बंद ! जागोजागी कचरा साचला ! नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगाव येथील घंटागाडी गेल्‍या अनेक दिवसांपासून बंद आहे. ग्रामपंचायतच्‍या दुर्लक्षामुळे घरोघरी आणि दुकानांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचत आहे. अनेकजण नाईलाजाने रस्‍त्‍याच्‍या कडेला कचरा टाकत असल्‍यामुळे गावात घाणीचे साम्राज्‍य पसरत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव हे मोठ्या बाजारपेठेचे शहर (गांव) आहे. शहराची लोकसंख्‍या जवळपास 20 ते 25 हजार आहे. खरं तर येथे किमान 2 घंटागाड्या असणे अपेक्षित होते परंतू 10 वर्षांपूर्वी जि.प.कडून मिळालेल्‍या एकच घंटागाडीवर संपूर्ण शहराचा कचरा उचलण्‍याचे काम केले जात होते, परंतू आता सदरील एकमेव असलेली घंटागाडी सुध्‍दा बंद आहे.

घंटागाडीवर ड्रायव्‍हर असलेल्‍या कर्मचाऱ्याला ग्रामपंचायतने पाण्‍याच्‍या टँकरवर ठेवले आहे. त्‍यामुळे मागील 20 दिवसांपासून घंटागाडी बंद आहे. काही दिवसांपूर्वीच घंटागाडीचे टायर व इतर तांत्रिक कामे करून घेण्‍यात आली होती, त्‍यामुळे घंटागाडीत तुर्तास तरी कोणतीही अडचण नाही, परंतू ग्रामपंचायतच्‍या नियोजनशुन्‍य कारभारामुळे गावात घाण व कचऱ्याचे साम्राज्‍य पसरले आहे.

खरंच कामगार मिळेना ?

एकीकडे लोकांना हाताला काम नाही म्‍हणून असंख्‍य मोलमजुरी करणारे कामगार हैराण आहेत, परंतू कुंभार पिंपळगांवात पाण्‍याच्‍या टँकरवर जाण्‍यासाठी माणूसच भेटत नाही त्‍यामुळे घंटागाडीच्‍या ड्रायव्‍हरला टँकरसोबत पाठवत असल्‍याचे ग्रामपंचायतचे म्‍हणणे आहे. खरंच कुंभार पिंपळगांवात पाण्‍याच्‍या टँकरवर ट्रक मध्‍ये बसून जाण्‍या-येण्‍यासाठी माणूस भेटत नसेल का ? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

ग्रामसेवकांची गैरहजेरी !

कुंभार पिंपळगांव येथील ग्रामसेवक यांना मागील काळात निवडणुकीचे काम होते असे त्‍यांनी सांगितल्‍यामुळे नागरिकांनी समजून घेतले. परंतू निवडणुका होवूनही ग्रामसेवकांना नियमित उपस्थित राहण्‍यात काय अडचण आहे असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. ग्रामसेवकांच्‍या गैरहजेरीमुळे गावात कचऱ्याची समस्‍या, पाण्‍याची समस्‍या व इतर अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या असून विकासकामांवरही परिणाम झाला आहे.

आता ग्रामसेवक कोणता मुहूर्त पाहून गावात येतात हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे. कदाचित चुकून ते आल्‍यास गावाबाहेर किंवा हॉटेलमध्‍ये किंवा झाडाखाली किंवा पेट्रोलपंपाच्‍या पुढे एखाद्याच्‍या कार्यालयात बसून ग्रामसेवकांना जास्‍त “अर्थपूर्ण” आनंद मिळत असेल अशीही प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी वर दिसत असलेल्‍या “जॉईन करा” या चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या व्‍हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!