Your Alt Text

कोणत्‍या विद्यार्थ्‍यांना अंडी खायला द्यायची आणि कोणत्‍या विद्यार्थ्‍यांना नाही ? आता असे ठरवले जाणार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
केंद्र आणि राज्‍य सरकार विद्यार्थ्‍यांच्‍या दृष्‍टीने वेळोवेळी निर्णय घेत असते. केंद्र सरकार पुरस्‍कृत प्रधानमंत्री पोषण शक्‍ती निर्माण योजने अंतर्गत राज्‍यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्‍या सर्व विद्यार्थ्‍यांना पोषण आहाराचा लाभ देण्‍यात येतो.

सदरील योजने अंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्‍या 5 टक्‍के निधी मधून नाविण्‍यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यांना अतिरिक्‍त पुरक पौष्टिक पदार्थ उपलब्‍ध करून देण्‍याचे निर्देश यापूर्वीच केंद्र शासनाने दिलेले आहेत. त्‍यानुसार नाविण्‍यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारा व्‍यतिरिक्‍त पुरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्‍यांना उपलब्‍ध देण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने महत्‍वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

सदरील निर्णयानुसार विद्यार्थ्‍यांना अंडी, केळी किंवा फळे देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. सदरील जीआर नुसार अंड्यांमध्‍ये उच्‍च प्रतिचे प्रथिने, उष्‍मांक, जीवनसत्‍वे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेड असल्‍याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्‍यास विद्यार्थ्‍यांची वाढ चांगल्‍या प्रकारे होवून त्‍यांची रोगप्रतिकारक शक्‍ती सुधारण्‍यास मदत होत असल्‍याचे सांगितले आहे.

मात्र जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्‍यांना पर्याय म्‍हणून केळी अथवा स्‍थानिक फळ उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे. जेणेकरून त्‍यांनाही अतिरिक्‍त पोषणमुल्‍य मिळणार आहे. मात्र शाळे मध्‍ये कोणत्‍या विद्यार्थ्‍यांना अंडी खायला द्यायची आणि कोणत्‍या विद्यार्थ्‍यांना अंडी खायला द्यायची नाही असा प्रश्‍न उपस्थित होत होता.

कोणाला अंडी खायला देणार ?

शासनाने दि.२४ जानेवारी 2024 रोजी नवीन जीआर काढला असून त्‍यानुसार सदरील नाविण्‍यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळा स्‍तरावर देण्‍यात येणाऱ्या लाभाबाबत संबंधित पालकाने त्‍याच्‍या पाल्‍यास अंडी खाण्‍यास सहमती दर्शविल्‍यास सदर पाल्‍याच्‍या ओळखपत्रावर स्‍पष्‍ट दिसेल असा लाल रंगाचा ठिपका देण्‍यात यावा.

तसेच जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा ज्‍यांच्‍या पालकांनी त्‍यांच्‍या पाल्‍यास अंडी खाण्‍यास सहमती दर्शविलेली नाही अशा विद्यार्थ्‍यांच्‍या ओळखपत्रावर हिरव्‍या रंगाचा ठिपका देण्‍यात यावा. जेणेकरून शाळा स्‍तरावर विद्यार्थ्‍यांना पोषण आहारा मध्‍ये अंडी व केळी यांचा लाभ देतांना सुलभता येईल असे जीआर मध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

याचाच अर्थ जे विद्यार्थी अंडी खातात त्‍यांना अंडी देण्‍यात येतील आणि जे अंडी खात नाहीत त्‍यांना केळी किंवा अपवादात्‍मक परिस्थितीत स्‍थानिक फळ देण्‍यात येणार आहे. शिवाय अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्‍यांच्‍या कार्डवर लाल रंगाचा ठिपका आणि अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्‍यांच्‍या कार्डवर हिरव्‍या रंगाचा ठिपका देण्‍यात येणार आहे. जेणेकरून दोन्‍ही प्रकारच्‍या विद्यार्थ्‍यांना पौष्टिक पदार्थ देण्‍यात अडचण येणार नाही.

GR डाउनलोड करा


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!