Your Alt Text

मोदी सरकार घेणार हा महत्‍वपूर्ण निर्णय ! कोट्यावधी शेतकऱ्यांना होणार फायदा ! | PMFBY Scheme Extension

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
PMFBY Scheme Extension : केंद्र सरकार असो किंवा राज्‍य सरकार असो, विविध घटकांसाठी वेळोवेळी योजना सुरू करत असते, तसेच या योजनांचा लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहोचवण्‍याचा प्रयत्‍न करत असते, ज्‍या माध्‍यमातून संबंधित लाभार्थ्‍यांना दिलासा मिळत असतो.

मोदी सरकारने मागील काळात शेतकऱ्यांच्‍या पिकांना संरक्षण मिळावे यादृष्‍टीने Pradhan Mantri Fasal Bima Yojana सुरू केली होती, या योजनेचा लाभ आजघडीला देशातील कोट्यावधी शेतकरी बांधव घेत आहेत, अर्थात योजनेमुळे विम्‍या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते.

पिकांची लागवड केल्‍यानंतर शेतकरी विमा भरत असतात आणि त्‍यानंतर काही नुकसान झाल्‍यास संबंधित विमा कंपनीच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असते. आता मोदी सरकार प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची व्‍याप्‍ती वाढवण्‍याच्‍या तयारीत आहे.

PMFBY Scheme Extension

वृत्‍तसंस्‍थेच्‍या माहितीनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील लाभांची व्‍याप्‍ती पिकांपुरती मर्यादित न ठेवता ही व्‍याप्‍ती वाढवण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी तलाव, ट्रॅक्‍टर, गुरे, ताडाची झाडे इत्‍यादी पीक विमा योजनेच्‍या कक्षेत आणण्‍याची तयारी सुरू आहे.

पोर्टल नवीन स्‍वरूपात

पंतप्रधान पीक विमा योजनेची व्‍याप्‍ती वाढवण्‍यासाठी केंद्र सरकार सदरील योजनेच्‍या पोर्टलला नवीन स्‍वरूप देवू शकते, म्‍हणजेच या पोर्टलला व्‍यापक व्‍यासपीठ म्‍हणून विकसित केले जावू शकते. ज्‍यामुळे शेतकऱ्यांना पिकांव्‍यतिरिक्‍त इतर मालमत्‍तेवर विमा संरक्षणाचा लाभ देता येईल. यासाठी सरकार 30 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्‍याची शक्‍यता आहे.

योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!