Your Alt Text

पीएम किसानचा 2000 चा हप्‍ता फक्‍त या शेतकऱ्यांनाच मिळणार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
PM kisan 16th installment date : केंद्र शासनाने सुरू केलेल्‍या पीएम किसान योजनेचा 2000 चा हप्‍ता केव्‍हा येणार या प्रतिक्षेत अनेक शेतकरी आहेत. गेल्‍या अनेक दिवसांपासून हप्‍ता कधी येणार अशी चर्चा सुरू होती परंतू आता प्रतिक्षा संपली असून असंख्‍य शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात 2000 चा हप्‍ता जमा होणार आहे.

आपल्‍याला माहितच आहे की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी PM Kisan Samman Nidhi Yojana (पीएम किसान सम्‍मान निधी योजना) सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वर्षभरात 2 हजार रूपयांचे 3 हप्‍ते म्‍हणजेच वर्षाला 6 हजार रूपये शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा केले जातात.

केंद्रा प्रमाणेच राज्‍य सरकारने सुध्‍दा नमो शेतकरी महासम्‍मान निधी योजना सुरू करून शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात पैसे ट्रान्‍सफर करण्‍यास सुरूवात केलेली आहे. म्‍हणजेच आता केंद्र सरकार कडून 2000 मिळत आहेत आणि राज्‍य सरकारकडून सुध्‍दा 2 हजार मिळत आहेत. सध्‍या तरी काही दिवसांच्‍या अंतराने केंद्राचे आणि राज्‍याचे स्‍वतंत्रपणे पैसे शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा होत आहेत.

2 हजाराचा हप्‍ता केव्‍हा मिळणार ?

यापूर्वी PM Kisan योजने अंतर्गत 15 वा हप्‍ता 15 नोव्‍हेंबर रोजी मिळाला होता, आता PM Kisan 16th Installment Date जाहीर करण्‍यात आली आहे. म्‍हणजेच पीएम किसानचा 16 वा हप्‍ता आता 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा होणार आहे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पाहू शकता…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!