एल्गार न्यूज :-
PM Kisan 15th Installment Date : सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवित असते, त्यापैकीच एक योजना म्हणजे पीएम किसान सम्मान निधी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही अंशी का असेना आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो.
भारत सरकार द्वारा देशातील शेतकऱ्यांना वर्षाला 2000 रूपयांचे 3 हप्ते म्हणजेच वर्षाला 6000 रूपये दिले जातात. आता शेतकऱ्यांना 15 वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.
आपल्याला माहितच आहे की, केंद्र सरकार PM Kisan Samman Nidhi योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 चा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करत असते. मागील हप्ता 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करण्यात आला होता. आता 15 वा हप्ता येणार आहे.
PM Kisan 15th Installment Date
सदरील पीएम किसान सम्मान निधी योजने च्या माध्यमातून देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो, रक्कम जरी कमी असली तरी या रक्कमेतून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामे करण्यासाठी काही अंशी का असेना हातभार लागतो.
कोणाला मिळणार हप्ता ?
पीएम किसान योजने अंतर्गत हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी E-kyc पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते आधारशी लिंक करणे सुध्दा आवश्यक आहे. लँड सिडींग करणेही आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केली असतील त्यांना हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
2000 चा हप्ता कधी मिळणार ?
यापूर्वीचा हप्ता म्हणजेच 14 वा हप्ता 27 जुलै रोजी मिळाला होता. वर्षातून तीन टप्प्यात 6000 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. आता 15 वा हप्ता येणार आहे, याबाबत सरकारकडून अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही, परंतू नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता येण्याची शक्यता माध्यमांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.