Your Alt Text

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2000 चा हप्‍ता ! कारण… | PM Kisan 15th Installment

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
PM Kisan 15th Installment : केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून विविध योजना राबविल्‍या जातात. प्रत्‍येक घटकांसाठी विविध योजना राबवून संबंधित योजनेचा लाभ लाभार्थ्‍यांपर्यंत पोहोचवला जातो, परंतू त्‍यासाठी शासनाच्‍या नियमांचे किंवा सूचनांचे पालन करणे आवश्‍यक असते.

आपल्‍याला माहितच आहे की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी PM Kisan Samman Nidhi Yojana सुरू केलेली आहे, यामध्‍ये देशातील असंख्‍य शेतकऱ्यांना वर्षाला 2000 चे 3 हप्‍ते म्‍हणजेच 6000 रूपये दिले जातात, सदरील पैसे थेट शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यात ट्रान्‍सफर केले जातात.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्‍याच्‍या दृष्‍टीने किंवा काही अंशी का असेना त्‍यांना आधार देण्‍याच्‍या दृष्‍टीने केंद्र सरकारने पीएम किसान सम्‍मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांना 6000 रूपये दिले जातात, अर्थातच या योजनेच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांना काही अंशी का असेना आधार मिळतो.

PM Kisan 15th Installment

आता केंद्र सरकारच्‍या धर्तीवरच राज्‍य सरकारने सुध्‍दा Namo Shetkari Mahasanman Nidhi ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातूनही केंद्रा प्रमाणेच राज्‍य सरकार सुध्‍दा शेतकऱ्यांना वर्षभरात 2000 चे 3 हप्‍ते म्‍हणजेच वर्षाला 6000 रूपये देणार आहे.

राज्‍य सरकारकडून पहिल्‍या हप्‍त्‍यासाठी 1720 कोटी रूपये नुकतंच मंजूरही करण्‍यात आले आहेत. म्‍हणजेच सदरील पैसे लवकरच शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात ट्रान्‍सफर केले जाणार आहेत. परंतू केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या या योजनेतून असंख्‍य शेतकरी वंचित राहणार असल्‍याचे दिसून येत आहे.

हप्‍ता कोणाला नाही मिळणार ?

  • ज्‍या शेतकऱ्यांनी E-Kyc पूर्ण केलेली नाही.
  • ज्‍यांचे आधार बँक खात्‍याशी लिंक नाही.
  • ज्‍यांनी लॅण्‍ड सिडींग (जमिन लिंक) केलेली नाही.

अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 2000 आणि राज्‍य सरकारचे 2000 म्‍हणजेच 4000 रूपये मिळणार नाहीत. राज्‍य सरकारच्‍या नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेचा लाभ घेण्‍यासाठी संबंधित शेतकऱ्याने पीएम किसान योजने अंतर्गत आलेल्‍या त्रुटी दूर करणे आवश्‍यक होते, मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे त्रुटी दूर केलेल्‍या नाहीत.

त्‍यामुळे दोन्‍ही योजनेपासून असंख्‍य शेतकरी वंचित राहणार आहेत. आताही वरील प्रमाणे त्रुटी दूर केल्‍यास शेतकऱ्यांना योजनेचा लाभ पुढील काळात मिळू शकतो.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!