तुम्‍हाला 2000 चा हप्‍ता मिळणार किंवा नाही ?

पीएम किसान योजनेचा 15 हप्‍ता मिळवण्‍यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्याला E-kyc करणे आवश्‍यक आहे. तसेच बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्‍यक आहे, तसेच लँड सीडींग (जमीन पडताळणी) प्रक्रिया पूर्ण करणे देखील आवश्‍यक आहे.

ईकेवायसी आपण मोबाईल किंवा CSC केंद्रात जावून करू शकता. तसेच बँक खाते आधारशी लिंक नसल्‍यास बँकेला तशी विनंती करू शकता किंवा पोस्‍टात नवीन खाते उघडून देखील त्‍या खात्‍याला आधारशी लिंक करू शकता. लँड सीडींगसाठी आपण तहसिल कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

जर आपण वरील तिन्‍ही गोष्‍टी पूर्ण केलेल्‍या असतील तर तुम्‍हाला पीएम किसानचा हप्‍ता मिळण्‍यात अडचण नाही. मात्र तिन्‍ही गोष्‍टींची पूर्तता झाली आहे किंवा नाही हे चेक करण्‍यासाठी आपण खालील प्रोसेस करून स्‍टेटस पाहू शकता.

How to Check PM Kisan Status

सर्वप्रथम तुम्‍हाला https://pmkisan.gov.in या शासनाच्‍या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, त्‍यानंतर Know Your Status ला क्लिक करावे लागेल, त्‍यानंतर आपला नोंदणी क्रमांक येथे टाकावा, नोंदणी क्रमांक माहित नसेल तर आधार द्वारे नोंदणी क्रमांक काढून त्‍याद्वारे स्‍टेटस पाहता येईल.

सदरील स्‍टेटस मध्‍ये आपणास ई-केवायसी झालेली आहे का ? बँक खाते आधारशी लिंक आहे का ? लँड सीडींग झालेली आहे का ? ही माहिती मिळेल. सदरील स्‍टेटस आपण जवळच्‍या CSC किंवा ई-सेवा केंद्रावरून सुध्‍दा प्रिंट काढू शकता.

योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!